पुणे : शाळा, महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. हडपसर आणि काळेपडळ परिसरातील आठ टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या. पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने ही कारवाई केली.शाळा आणि महाविद्यालयाच्या शंभर मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाने आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासनाचे आदेश धुडकावून सर्रास शहरातील अनेक शाळा, महाविद्यालयांच्या परिसराती टपऱ्यांमधून तंबाखू, सिगारेट, तसेच छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मगरपट्टा सिटी भागातील एका कार्यक्रमात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे नागरिकांनी बुधवारी तक्रार केली. चहाच्या टपरीवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाळा, महाविद्यालयांच्या परिसरातील टपऱ्यांवर कारवाईचे आदेश जाहीर कार्यक्रमात दिले होते.

त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली हडपसर आणि काळेपडळ परिसरातील आठ टपऱ्यांवर पोलिसांनी कारवईा केली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सहकार्याने टपऱ्यांवर जेसीबी यंत्र चालवून टपऱ्या काढून टाकल्या. काळेपडळ भागातील एका नामांकित शाळेजवळ असलेल्या पाच पान टपऱ्या पोलिसांनी जेसीबी यंत्राचा वापर करुन काढून टाकल्या. काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मगरपट्टा भागातील एका शाळेजवळ तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या तीन टपऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

शहरभर कारवाईचा इशारा

शहर, तसेच उपनगरातील अनेक शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पानटपऱ्या आहेत. विद्यार्थ्यांना सहजपणे गुटखा, सिगारेटची पाकिटे उपलब्ध होतात. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानंतर शहरातील सर्व शाळांच्या परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यात येणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police action against vendors selling tobacco products near schools and colleges pune print news rbk 25 sud 02