समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीतून अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी उकळण्याच्या धंद्यात (सेक्सटाॅर्शन) राजस्थानातील आणखी एक गाव सामील असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणात तपास करुन भरतपूर परिसरातील रायपूर सुकेती या गावातून एका २४ वर्षीय तरुणाला अटक केली असून, सेक्सटाॅर्शनच्या धंद्यात रायपूर सुकेतीमधील आणखी काही सामील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा >>> पुणे : गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद
समाजमाध्यमातून तरुणीशी मैत्रीचे आमिष दाखवून पुण्यातील दोन तरुणांना जाळ्यात ओढण्यात आले होते. समाजमाध्यमावर ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे खंडणी मागण्यात आली होती. आरोपींच्या धमक्यांमुळे दत्तवाडी तसेच पद्ममावती भागातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर दत्तवाडी पोलिसांच्या पथकाने राजस्थानातील गुरुगोठिया गावात छापा टाकून आरोपींना अटक केली होती. त्या वेळी गुरुगोठिया गावातील ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. दत्तवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात गुरुगोठिया गावातील तरुण सेक्सटाॅर्शनच्या धंद्यात सामील असल्याचे उघडकीस आले होते.
दरम्यान, पद्मावती भागातील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाचा सहकारनगर पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तरुणाला खंडणीसाठी धमकावून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यात रायपूर सुकेती गाव आहे. या गावातील तरुण सेक्सटाॅर्शनच्या धंद्यात सामील असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी आरोपीला पकडण्याचे आदेश दिले होते.
हेही वाचा >>> पुण्यात नायलॉन मांजामुळे दोन पोलिस कर्मचारी जखमी; एकाचा गळा, तर दुसऱ्याचा हात चिरला
त्यानुसार सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळराम साळगावकर यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले.
रायपूर सुकेती गावात आठ दिवस पाळत
सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, संजय गायकवाड, सागर सुतकर, निखील राजवाडे, सागर कुंभार राजस्थानला पोहोचले. रायपूर सुकेती गावात पोलिसांनी सापळा लावला. आठ दिवस पोलिसांनी पाळत ठेवली. राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने पुणे पोलिसांनी सेक्सटाॅर्शन प्रकरणात एका २४ वर्षीय तरुणाला अटक करुन त्याला पुण्यात आणले. न्यायालयाने त्याला आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
‘या गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपी तरुणाचे नाव आता सांगणे योग्य ठरणार नाही. रायपूर सुकेती गावातील अनेक जण सेक्सटाॅर्शनच्या गुन्ह्यात सामील आहेत’ असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी सांगितले.
सेक्सटाॅर्शन म्हणजे काय ?
समाजमाध्यमावर अनोळखी तरुणी मैत्रीची विनंती पाठवते. विनंतीला प्रतिसाद दिल्यानंतर तरुणी संवाद साधते. त्यानंतर जाळ्यात ओढून तरुणांचे आक्षेपार्ह अवस्थेतील स्क्रीनशाॅट आरोपी मोबाइलवर काढतात. स्क्रीनशाॅट किंवा ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली जाते. अशा प्रकारच्या गु्न्ह्यांना सेक्सटाॅर्शन असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.