पुणे : भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या चोरट्यांना चतु:शृंगी पोलिसांनी नालासोपारा परिसरातून अटक केली. चोरट्यांकडून ३० तोळे सोन्याचे दागिने, रोकड, मोबाइल संच असा २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद रईस अब्दुल आहद शेख (वय ३७, रा. मालवणी, मुंबई), मोहम्मद रिजवान हनीफ शेख (वय ३३, रा. जोगेश्वरी, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शेख मुंबईतून घरफोडी करण्यासाठी ते भाडेतत्त्वावर मोटार घेऊन पुण्यात यायचे. २३ मार्च रोजी बाणेर परिसरातील सकाळनगर परिसरात दोन ठिकाणी भरदिवसा घरफोडी झाली होती. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा…पुणे : रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहानासह दोघे अटकेत, मध्यरात्री शिवाजीनगर विशेष न्यायालयात हज

तांत्रिक तपासात शेख यांनी घरफोडी केल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तपास करून दोघांना नालासोपारा परिसरातून अटक केली. पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, सहायक आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, गुन्हे शाखेचे निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक निरीक्षक नरेंद्र पाटील, उपनिरीक्षक रुपेश चाळके, सुधीर माने, श्रीकांत वाघवले, बाबूलाल तांदळे, बाबा दांगडे, किशोर दुशिंग यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा…पुण्यात ४ जूनपर्यंत दारूचे नवे परवाने, रिन्युएशन बंद

पुण्यात रिक्षाने प्रवास

आरोपी हे मुंबईहून भाडेतत्त्वावर घेतलेल्या मोटारीतून पुण्यात यायचे. घरफोडी केल्यानंतर ते पुणे स्टेशन परिसरातून मुंबईकडे पसार व्हायचे. मोहम्मद रईस सराइत चोरटा असून त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात ३० गुन्हे दाखल झाले आहेत. मोहम्मद रिजवानविरुद्ध सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यात ते रिक्षाने फिरायचे. पत्ता विसरलो असल्याचे सांगून ते रिक्षाचालकाला वेगवेगळ्या भागात न्यायचे. तेथील जुन्या इमारतींतील बंद सदनिकांची पाहणी करुन घरफोडी करायचे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrest thieves from mumbai who involved in house robbery recover stolen items worth rs 20 lakh pune print news rbk 25 psg