पिंपरी  :  तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान उर्फ भानु खळदे याला अखेर नाशिक परिसरातून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खळदे हा दीड महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किशोर आवारे  यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने डोक्यात वार करून १२ मे रोजी हत्या करण्यात आली. याप्रकरणाचा सूत्रधार तळेगाव दाभाडे येथील माजी नगरसेवक चंद्रभान खळदे यांचा मुलगा गौरव खळदेचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली. या गुन्ह्याच्या कटकारस्थानात चंद्रभान खळदे यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते.

हेही वाचा >>> पुणे: राजस्थानातील तरुणाकडून साडेचार लाखांची अफू जप्त

 किशोर आवारे आणि चंद्रभान खळदे यांनी एकत्रित येत तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समिती या स्थानिक राजकीय आघाडीचे निर्मिती केली होती. त्या माध्यमातून खळदे यांच्या पत्नी हेमलता खळदे या नगरसेवक पदावरही निवडून आलेल्या होत्या, तर जनसेवा विकास समितीचे सहा नगरसेवक ही निवडून गेलेले होते. मात्र, त्यानंतर खळदे आणि आवारे यांच्यात वैचारिक मतभेद होऊन दोघेही विभक्त झाले होते. डिसेंबर २०२१ मध्ये मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वात  चंद्रभान खळदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी खळदे हे काँग्रेसच्या माध्यमातून चार वेळा नगरसेवक पदावर निवडून आलेहोते.

हेही वाचा >>> आयटी कंपनीतील नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देवून ७० जणांची फसवणूक करणारी टोळी अटकेत

डिसेंबर २०२२ मध्ये वृक्षतोडीच्या प्रकरणातील वादावरून किशोर आवारे यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात चंद्रभान खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचा राग मनात धरून खळदे यांनी आवरे यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे तपासात समोर आले होते. या प्रकरणात पोलिसांनी पाच हल्लेखोर यांना अटक केलेली आहे. अभियंता असलेल्या गौरव खळदे याच्या तपासात वडिलांचाही सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चंद्रभान खळदे यांचा शोध सुरू केला. मात्र ते मागील दीड महिन्यापासून फरार झालेले होते. पोलीस पदके त्यांचा शोध घेत होते. अखेर खळदे यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.