पुणे : सोसायटीतील बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरणाऱ्या मध्य प्रदेशातील चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने गजाआड केले. चोरट्यांकडून आठ लाख ८४ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, घरफोडीचे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. मुकेश ग्यानसिंग भुरीया (वय २७), सुनिल कमलसिंह अलावा (वय २८), हरसिंह वालिसिंह ओसणीया (वय २२), सुंदरसिंह भयाणिंसह भुरिया (वय २५,सर्व रा. धार, मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मध्य प्रदेशातील चोरट्यांची टोळी मध्यरात्री सोसायटीच्या आवारात शिरायची. बंद सदनिकांची पाहणी करुन कटावणीने कुलूप तोडायचे. ऐवज लांबवून पसार व्हायचे. याप्रकरणी खडकी, येरवडा, विश्रांतवाडी, कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. मध्य प्रदेशातील चोरट्यांची टोळी खडकीतील रेंजहिल्स परिसरात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारला मिळाली.

हेही वाचा : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

पोलिसांनी सापळा लावून चोरट्यांना पकडले. चोरटे घरफोडीचे गुन्हे करण्यासाठी मध्यप्रदेशातून पुण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील आणि पथकाने ही कारवाई केली.