वैकुंठ स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी कृत्य करणाऱ्या दोन तृतीयपंथीयांना विश्रामबाग पोलिसांनी अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणी लक्ष्मी निंबाजी शिंदे (वय ३१, रा. अंधेरी, मुंबई), मनोज अशोक धुमाळ (वय २२, रा. कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत वैकुंठ स्मशानभूमीतील सुरक्षारक्षकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दोघांच्या विराेधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे: नाताळात स्ट्रॉबेरीची भुरळ !स्ट्रॉबेरीच्या मागणीत वाढ

शिंदे आणि धुमाळ तृतीयपंंथीय आहेत. गुरुवारी मध्यरात्री दोघे जण दुचाकीवरुन स्मशानभूमीत आले. अंत्यविधी चौकशीसाठी दोघे जण आल्याची शक्यता वैकुंठ स्मशानभूमतील सुरक्षारक्षकास वाटले. दोघे जळणाऱ्या चितेजवळ अघोरी कृत्य करत होते. सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चितेजवळ काळ्या रंगाच्या बाहुल्या, अर्धवट जळालेली छायाचित्रे, लिंबू, सुई, हळद-कुंकू आढळून आले, असे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police arrested transgender for black magic at vaikunth crematorium pune print news rbk 25 zws
Show comments