पुण्याच्या बाणेर भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. या प्रकरणी मसाज सेंटरचा मालक, व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींना ताब्यात घेतले आहे. दीपक कृष्णा पाटील (वय २६, रा. बाणेर), पंचमाया लेपचा (रा. लिंक रोड, पाषाण) आणि सचिन प्रकाश शिंदे (वय २४, रा. काळेवाडी, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी प्रवीण धोंडीराम दुरगुडे (वय २५, रा. दिघी) याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मनीषा पुकाळे यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाणेरमधील एका इमारतीत डिव्हाईन स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका पोलिसाला ग्राहक म्हणून संबंधिज मसाज सेंटरमध्ये पाठवलं. यातून खातरजमा झाल्यानंतकर पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक आणि पथकाने मसाज सेंटरवर छापा टाकून मसाज सेंटरच्या मालकासह तिघांना अटक केली. या कारवाईत तीन तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे.