वानवडी भागात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी मसाज सेंटरच्या व्यवस्थापक महिलेसह मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला तसेच परदेशी महिलेसह चौघींना ताब्यात घेण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : रीक्षाचालकावर शस्त्राने वार तिघांविरोधात गुन्हा

या प्रकरणी मसाज सेंटरची व्यवस्थापक प्रीती विकास गायकवाड (वय ३३, रा. महंमदवाडी, हडपसर), मालक अंकुश जाधव (रा. लोहगाव) यांच्या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडीतील केदारीनगर भागात एका इमारतीत व्हीआयपी फॅमिली स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी मसाज सेंटरवर छापा टाकून चार महिलांची सुटका केली. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांपैकी एक महिला थायलंडची आहे.

हेही वाचा >>> पुणे : बिबवेवाडीत टेम्पोच्या धडकेने पादचारी महिलेचा मृत्यू

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, उपनिरीक्षक श्रीधर खडके, सुप्रिया पंढरकर, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनीषा पुकाळे आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police busted prostitution racket at spa parlour pune print news zws