राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळवत अधिकारी झालेल्या दर्शना पवारची तिचाच मित्र राहुल हंडोरेने हत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी राहुल हंडोरेने दर्शनाने लग्नाला नकार दिल्यानं तिचा खून केल्याची कबुली दिली आहे. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. दर्शना आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते का? आधी प्रेमसंबंध आणि नंतर ते वेगळे झाले होते का? आधी प्रेमसंबंध संपवलेले असताना दर्शना अधिकारी झाल्यावर राहुलने तिला लग्नाची मागणी घातली का? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. याबाबत पोलिसांना विचारलं असता पुणे पोलीस अधीक्षक अंकित गोयल गुरुवारी (२२ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत यावर प्रतिक्रिया दिली.

दर्शना पवार आणि आरोपी राहुल हंडोरेंचं प्रेमप्रकरण होतं का? यावर अंकित गोयल म्हणाले, “दर्शना आणि आरोपी राहुल यांच्यात आधी प्रेमसंबंध होते का, ब्रेक अप झालं का याविषयी आम्हाला आत्ताच सांगता येणार नाही.”

jalna inter religious marriage news in marathi
साखळदंडाने बांधलेल्या विवाहितेची मुलासह मुक्तता, आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Milind Gawali
मिलिंद गवळींनी पत्नीबद्दल सांगितला लग्नानंतरचा भन्नाट किस्सा; म्हणाले, “सात फेरे झाल्यानंतर…”
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
Archana Puran Singh Accident
Video : शूटिंगदरम्यान मोडला अर्चना पूरन सिंहचा हात; आईची अवस्था पाहून आर्यमनला कोसळलं रडू
Sandeep Kshirsagar FB
“धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य”, अजित पवारांच्या त्या प्रतिक्रियेनंतर संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
baba siddique
सिद्दिकी हत्येप्रकरणी पुन्हा चौकशी करा,झिशानला माहीत असलेले सत्य बाहेर येईल; अनिल परब
Mohit Kambo
बाबा सिद्दिकींच्या डायरीत नाव, हत्येच्या काही तास आधी चर्चा; मोहित कंबोज यांचं कथित आरोपांवर स्पष्टीकरण

“त्यांची आधीपासून ओळख होती एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. सखोल चौकशीनंतरच त्यांचं प्रेम प्रकरण होतं की नाही हे समजू शकेल,” असं अंकित गोयल यांनी सांगितलं.

“…म्हणून आरोपी राहुलने दर्शनाचा खून केला”

खून करण्याचं कारण सांगताना अंकित गोयल म्हणाले, “आम्हाला सखोल तपास करण्यासाठी वेळ मिळालेला नाही. मात्र, प्राथमिक तपासात असं दिसतंय की, दर्शना पवारने राहुल हंडोरेला लग्नासाठी नकार दिला. त्यामुळे त्याने दर्शनाचा खून केला. दोघांचीही खूप जुनी ओळख आहे. आरोपीला राहुलला दर्शनाबरोबर लग्न करायचं होतं. दर्शनाने या लग्नाला नकार दिला म्हणून राहुलने खून केल्याची प्राथमिक माहिती आहे.”

हेही वाचा : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झालेल्या दर्शनाची हत्या; शेवटच्या भाषणात म्हणालेली, “मला…”

आरोपी राहुल हंडोरे कोण आहे?

“आरोपीही एमपीएससीची तयारी करत होता. तो गेल्या काही वर्षांपासून अर्धवेळ नोकरी करून स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा. त्याने वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या आहेत. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होता आणि एका रुममध्ये रहात होता. दोघांची ओळख लहानपणापासून होती,” अशी माहिती अंकित गोयल यांनी दिली.

हेही वाचा : MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी झाली, सत्काराला गेली अन्…; दर्शना पवारच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे

“दर्शनाच्या मामाचं घर आणि आरोपी राहुल हंडोरेचं घर समोरासमोर”

“दर्शनाच्या मामाचं घर आणि आरोपी राहुल हंडोरेचं घर समोरासमोर होतं. त्यामुळे दोघांची लहानपणापासून ओळख होती. दोघांचं प्रेमप्रकरण होतं की नाही हे सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होईल,” असंही अधीक्षक गोयल यांनी नमूद केलं.

Story img Loader