शेअर दलालाचे २० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण करून मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कोथरुडमधील गुंड गजानन उर्फ गज्या मारणे पसार झाला असून त्याला पकडण्यासाठी गुन्हे शाखेकडून पथके तयार करण्यात आली आहेत. मारणेला आश्रय देणाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

गज्या मारणे याच्यासह १४ जणांच्या विरोधात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाईचे आदेश मंगळवारी रात्री दिले. त्यानुसार गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, जि. सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. शेअर दलालाचे अपहरण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात चौघांना अटक करण्यात आली आहे. गज्या मारणे आणि साथीदार पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मारणेला आश्रय देणारे, त्याला आर्थिक मदत करणारे आढळून आल्यास त्यांच्यावरही मोक्का कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त गुप्ता यांनी दिला आहे.

emergency qr code on vehicles loksatta
नागपूर : अपघातग्रस्ताची ओळख करून देणार ‘क्यू आर कोड’, तात्काळ उपचारासाठी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
Thane , non-agricultural tax , notices, Thane citizens,
सरकारने रद्द केलेल्या अकृषिक कराच्या ठाणेकरांना नोटीसा, नोटीसांमुळे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’
Pune Traffic, Pune Encroachment , Muralidhar Mohol,
पुणे : प्रशासन ऐकत नसल्याने भाजपचे मंत्री झाले हतबल ! म्हणाले…
bahubaliche beed loksatta article
बाहुबलीचे बीड : ‘विहिरी’तील कोट्यवधींच्या घबाडावर बाहुबली गब्बर, राखेतील परळीत ‘शांतता राखा’!
Suresh Dhas
Suresh Dhas : “पहिली पसंती मुख्यमंत्र्यांना, अजित पवार झाले तर…”, बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सुरेश धस यांचं स्पष्ट मत
Story img Loader