पुण्यात आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तीव्र पडसाद उमटले. यानंतर या प्रकरणातील आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर आरोपीच्या वडिलांनाही अटक करण्यात आली. या सर्व घटनेते दोन एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, तसेच आरोपीला पोलीस ठाण्यात पिझ्झा खायला दिल्याचा आरोप होत आहे. याबरोबरच यासह आरोपांवर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत सविस्तर माहिती दिली आहे.

या सर्व घटनेसंदर्भात पोलिसांनी आत्तापर्यंत काय तपास केला, यासंदर्भात सविस्तर माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. तसेच हा अपघात घडल्यानंतर पोर्श या गाडीतील ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी त्यांचा मुलगा गाडी चालवत नव्हता हे दाखवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती चौकशीत समोर आल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?
Pune Drunk drivers, proposal to suspend licenses,
पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव
drug cartel kingpin lalit patil
चाकणमधील मेफेड्रोन प्रकरण;  खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ; अमली पदार्थ तस्कर ललित पाटील मुख्य आरोपी

हेही वाचा : ‘दोन एफआयआर का, गाडीत किती लोक होते, आरोपीला पिझ्झा दिला का?’; पोर्श कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्तांची महत्वाची माहिती

अमितेश कुमार म्हणाले, “आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवल्यानंतर घडलेल्या अपघाताच्या घटनेत दोघांचा मृत्यू झाला. यानंतर १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाऐवजी गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न केला गेला. जेणेकरून अल्पवयीन तरुण अडचणीत येऊ नये, त्यासाठी हा प्रकार केला गेला असावा. सुरूवातीला ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचं त्यानं सांगितलं होतं. मात्र, आम्ही आता या घटनेचा तपास करत असून ड्रायव्हरने कोणाच्या दबावाखाली हे वक्तव्य केलं, याचाही शोध घेणार आहोत”, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

“या घटनेतील आरोपीचे ब्लड रिपोर्ट अद्याप आले नाहीत. सुरुवातीला ब्लड सॅपल घेण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही ब्लड सॅपल घेण्यात आले होते. त्यामध्ये आमचे फॉरेन्शिक लॅबला पाठवले आहेत. आरोपी मद्य पित असतानाचे सीसीटीव्ही आमच्याकडे आहेत. त्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू आहे. येरवडा पोलीस ठाण्यात काय घडलं याचा तपास सुरु आहे. तसेच स्थानिक आमदार तेथे आले होते का? याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपीला त्याच्या या कृत्यामुळे अपघात होईल, याची जाणीव होती. या प्रकरणाती एका एका घटनेचा बारकाईने तपास पोलीस करत आहेत. या घटनेदरम्यान गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, ही बाब आमच्या चौकशीत समोर आली आहे. तसेच काहीजण करत असल्याचे आरोप योग्य नाहीत”, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.