पुणे : पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला खंडणी विरोधी पथकाने मुंढवा भागात पकडले. सराइताकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रतीक योगेश चोरडे (वय २१, रा. ओमसाई अपार्टमेंट, केशवनगर, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. चोरडेविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती खंडणी विरोेधी पथकातील पोलीस कर्मचारी अमोल घावटे आणि चेतन आपटे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून चोरडेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल सापडले.

हेही वाचा : पुणे: फर्ग्युसन रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा

पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, सुरेंद्र जगदाळे, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, राहुल उत्तरकर, अनिल कुसाळकर यांनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police commissioner orders action against insurgents carrying weapons pune print news rbk 25 css