पुणे : सर्व संघटनांचे वैचारिक स्वातंत्र्य अबाधित राखून विद्यापीठाशी संबंधित त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहेत. संघटनांकडून होणारी आंदोलने, सभा, कार्यक्रम आदींसाठी सर्वसंमतीने नवीन कार्यपद्धत विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . गेल्या काही दिवसांत विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये झालेली हाणामारी, राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विद्यापीठातर्फे पोलिस, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्यासोबत सुसंवाद बैठक झाली.

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, पोलीस आयुक्त रीतेशकुमार अतिरिक्त सहायक पोलिस आयुक्त रंजन शर्मा, माजी पोलीस सहसंचालक जयंत उमराणीकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. देविदास वायदंडे, बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले या वेळी उपस्थित होते.

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Akola Sessions Court sentenced family to death citing Mahabharata High Court disagreed
‘महाभारताचा’ उल्लेख करत फाशीची शिक्षा, उच्च न्यायालयाचे सत्र न्यायालयावर ताशेरे…
Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका

हेही वाचा : VIDEO : नामदेव जाधवांच्या तोंडाला कार्यकर्त्यांनी काळं फासलं, राष्ट्रवादीच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

आंदोलन, अनुचित प्रकाराबाबत विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची इच्छा नसते. मात्र, काहीवेळा अपरिहार्य कारणामुळे ती वेळ येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घेऊनच लोकशाही मार्गाने सहभागी व्हावे, असे रितेशकुमार यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून सर्व प्रक्रियांचे पालन केल्यास पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करणार नसल्याची हमी शर्मा यांनी दिली.

हेही वाचा : VIDEO: शरद पवार समर्थकांनी नामदेव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं

विद्यार्थी आणि कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सर्व प्रतिनिधींचा समावेश करून सर्वसमावेशक कार्यप्रणाली विकसित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विद्यार्थी हा विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलाचा कणा आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतच्या समन्वयानेच विद्यापीठाची भविष्यात प्रगती होणार आहे, असे डॉ. गोसावी यांनी सांगितले.