पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पब आणि बारविरुद्ध पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला. संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कल्याणीनगरमधील बॉलर पबला नोटीस बजावली आहे. संभाव्य दहशतवादी हल्ला, तसेच दहशतवाद्यांकडून गर्दीची ठिकाणी लक्ष्य करण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर बॉलर पबचा डिस्कोथेक परवाना रद्द का करण्यात येऊ नये?, अशी नोटीस पोलीस आयुक्तांनी बजावल्याने शहरातील पबचालक धास्तावले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण, तरुणींचा मृत्यू झाला. कल्याणीनगमधील बॉलर पबसमोर हा अपघात झाला होता. अपघात प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत एका पबमध्ये मद्यपार्टी केल्याचे तपासात उघडकीस आले होते. अल्पवयीन मुलाला बेकायदा पबचालकांनी मद्य विक्री केल्याप्रकरणी पबमालक, व्यवस्थापकांसह कर्मचाऱ्यांनी अटक करण्यात आली होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी शहरातील पबचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. फर्ग्युसन रस्त्यावरील एलथ्री बारमधील पार्टीत अमली पदार्थांचे सेवन केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी बाचालकासह १५ जणांना अटक केली होती.

हेही वाचा…सरकारने व्यापाऱ्यांसाठी ‘लाडके व्यापारी’ योजना जाहीर करावी- पुणे व्यापारी महासंघाची मागणी

पोलिसांनी शहरातील पब आणि बारचालकांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बॉलर पबमध्ये दर शनिवारी तरुणाईची मोठी गर्दी होती. शहरातील गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांकडून लक्ष्य केली जायची शक्यता आहे. संभाव्य दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमवर बॉलर पबला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच नोटीस बजाविली. ‘ दहशतवादी संघटना घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत आहेत. गर्दीची ठिकाणे चोरट्यांकडून लक्ष्य केली जाऊ शकतात. यापार्श्वभूमीवर डिस्कोथेकचा परवाना रद्द का करण्यात येऊ नये, ’ अशी नोटीस पोलिसांनी बजावली आहे.

हेही वाचा…जैवइंधन : भारताच्या ऊर्जेच्या गरजांसाठी, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी शाश्वत उपाय

नोटीशीमुळे पबचालक धास्तावले

पोलीस आयुक्तांनी नोटीस बजावल्याने शहरातील पबचालक धास्तावले आहेत. गणेशोत्सव महिनाभर येऊन ठेपला आहे. पोलीस आयु्कतांनी दहशतवादी हल्ल्यांची सूचना दिली. शहरातील ५१ ठिकाणे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहे. तेथे कायमस्वरुपी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police crack down on pubs after kalyaninagar accident terror alert leads to notice issuance pune print news rbk 25 psg