पुणे : पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेने दिल्लीनंतर सांगलीत छापे टाकून मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. दिल्लीत केलेल्या कारवाईत पोलिसांनी ९७० मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी दिल्लीतून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. दिवेश चिरंजीत भुटिया, संदीप राजपाल कुमार (दोघे रा. नवी दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मेफेड्रोन निर्मती करणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ ओैद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅबोरटीज कंपनीचे मालक भिमाजी उर्फ अनिल परशुराम साबळे (वय ४५), अभियंता युवराज बब्रुवान भुजबळ (वय ४०) यांना अटक केली. यापूर्वी गुंड वैभव उर्फ पिंट्या भारत माने (वय ४२, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), हैदर नुर शेख (वय ४०,रा. विश्रांतवाडी), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५) यांना अटक करण्यात आली होती. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात गुंड वैभव उर्फ पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया यांना सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा