पुणे : ससून रुग्णालय परिसरात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी एका बड्या अमली पदार्थ तस्करासह तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी कारवाई सातत्याने करण्यात येते.
हेही वाचा : पुणे : तरुणाचा निर्घृण खून केलेल्यास जन्मठेप
त्यातून विविध प्रकारचे अमली पदार्थ आणि कोट्यवधी रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयात वॉर्ड क्रमांक तेरामध्ये येरवडा कारागृहातील कैद्यांना उपचारासाठी दाखल करण्यात येते. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.