वादात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा खुनाचा कट पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे उधळला गेला. गुन्हे शाखेने दोघांना अटक करुन त्यांच्याबरोबर असलेल्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. आरोपींकडून कोयता, कुऱ्हाड, तलवार अशा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी रहात असलेल्या परिसरात त्यांची धिंड काढली.

या प्रकरणी समीर सलीम शेख (वय १९), शाहीद फरीद शेख (वय २६, दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना कोंढव्यातून ताब्यात घेतले. ते ज्या भागात राहायला आहेत, त्या परिसरातून पोलिसांनी त्यांची धिंड काढली.

हेही वाचा >>> पुणे : पाषाण, बाणेर परिसरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगने दहशत माजविल्याच्या घटना घडल्या आहेत. अल्पवयीन मुलांच्या दोन गटात वाद झाला होता. कोंढव्यातील खालिद सैय्यद याचा सलमान नावाच्या मुलाशी वाद झाला होता. त्या वेळी सलमानने खालिदला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

घोरपडे पेठेतील मोमीनपुरा परिसरात सलमान राहायला असून खालिदचे साथीदार समीर शेख, शाहीद शेख यांनी सलमानचा खून करण्याचा कट रचला होता. गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अनिकेत बाबर यांना खबऱ्याने ही माहिती दिली. आरोपी कोंढवा भागात थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्वरीत कारवाई करुन आरोपी समीर, शाहीद आणि तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक संदीप भोसले, उपनिरीक्षक अजय जाधव, सुनील कुलकर्णी, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, इम्रान शेख, तुषार माळवदकर, विठ्ठल साळुंखे आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader