भाजपा कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यात निर्भय बनो हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा दलातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाला. दरम्यान, या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती अशी प्रतिक्रिया पुणे पोलिसांनी दिली आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे पोलीस म्हणाले, राष्ट्रीय सेवा दलाने आयोजित केलेल्या निर्भया बनो कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मी हे जबाबदारीने सांगू शकतो की या कार्यक्रमाला परवानगी नव्हती. परंतु, निखिल वागळे येणार असल्याने आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता. कारण, त्यांच्यावर कालच पुणे शहरांत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्याविरोधात वातावरण असल्याची कल्पना आम्ही त्यांना आधीच दिली होती. त्यांच्यासाठी सुरक्षाही पुरवली होती.

हेही वाचा >> पुणे : निखिल वागळे यांची गाडी फोडली, गाडीवर शाईफेक

“ते त्यांच्या खासगी गाडीतून निघाले. त्यांनी पोलीस सुरक्षा घेतली नाही. ते कार्यक्रम स्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कोणीतरी दगडफेक केली. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून विश्रामबाग पोलीस ठाणे आणि डेक्कन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येईल”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> “भाजपा कार्यकर्त्यांनी महिलांवर अंडी फेकली, दगडं फेकून डोकी फोडली”, ‘मविआ’च्या जखमी कार्यकर्त्यांनी सांगितला घटनाक्रम

नेमकं काय घडलं?

निर्भय बनो या सभेचे राष्ट्रसेवा दल येथे आयोजन करण्यात आले आहे. निखिल वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांनी पुण्यात येण्यास विरोध केला होता. तसेच या सभेस परवानगी न देण्याची मागणीही करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर निखिल वागळे यांना विरोध करण्यासाठी सभा स्थळाच्या बाहेर सायंकाळपासून भाजप कार्यकर्ते जमा झाले, तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर निखिल वागळे यांची गाडी त्या ठिकाणी येताच गाडीची पुढची काच फोडण्यात आली, गाडीवर शाईफेक करण्यात आली, काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर आडवे पडून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police explain about nirbhaya bano program incident nikhil wagle car attack sgk