पुणे : वाघोली भागातून हरवलेल्या तीन वर्षांच्या बालकाचा शोध पोलिसांनी चार तासात लावला. एका महिलेने हरवलेला मुलगा सापडल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा पालकांचा शोध घेऊन मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. वाघोलीतील बायफ रस्त्यावरील निखार लेडीज शाॅपजवळ मनीषा चेतन सोनार यांना एक तीन वर्षांचा मुलगा दिसला. सोनार यांनी त्याच्याबरोबर कोण आहे का ?, याचा शोध घेतला. मात्र, त्याच्या पालकांचा शोध न लागल्याने त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी प्रतिक्षा पानसरे, सचिन पवार यांना दिली. त्यांनी याबाबततची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना दिली. शहरातून बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान माेहीम राबविण्यात येत आहे.

हेही वाचा :कात्रज चौकात आजपासून वाहतूकबदल, उड्डाणपुलाच्या कामानिमित्त पर्यायी मार्ग

a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Crime News
Kolkata Crime : वडिलांच्या प्रेयसीची अल्पवयीन मुलाकडून हत्या, बापाचे विवाहबाह्य संबंध शोधण्यासाठी केला GPS चा वापर
Saif Ali Khan attack case, Saif Ali Khan,
सैफ हल्ला प्रकरण : आरोपीचा चेहऱ्याच्या पडताळणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
Crime News In Marathi
Crime News : आतडे फाडले अन् हवेत… आईच्या प्रियकराची भावंडांकडून क्रूर हत्या
Murder accused nabbed after 15 years
पत्नीची हत्या, फरार पतीला १५ वर्षांनी अटक
Sangli Crime News
Sangli Crime : सांगलीत १०० रुपयांचं स्क्रिन गार्ड ५० रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाची हत्या, तिघांना अटक

वाघोली भागात तीन वर्षांचा मुलगा सापडल्याची माहिती छायाचित्रासह पोलिसांनी त्वरीत समाज माध्यमात प्रसारित केली. पोलिसांनी डोमखेल रस्ता, बायफ रस्ता, दत्तविहार परिसरातील सोसायटी, तसेच मजुरांच्या वसाहतीत शोधमोहीम राबविली. त्यानंतर अक्षय संस्कृती सोसायटीतून एक तीन वर्षांचे बालक बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथक तेथे पाेहाेचले. पोलिसांनी बालकाचे छायाचित्र सोसायटीतील रहिवाशांना दाखविले. मुलाच्या आईने छायाचित्र पाहिले. मुलगा सुखरुप सापडल्याने तिला अश्रृ अनावर झाले. पोलिसांनी मुलाचा शोध घेऊन त्याला सुखरुप ताब्यात दिल्याने मुलाच्या आईने पोलिसांचे मनाेमन आभार मानले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, कीर्ती मांदळे यांनी ही कामगिरी केली.

Story img Loader