पुणे : वाघोली भागातून हरवलेल्या तीन वर्षांच्या बालकाचा शोध पोलिसांनी चार तासात लावला. एका महिलेने हरवलेला मुलगा सापडल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा पालकांचा शोध घेऊन मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. वाघोलीतील बायफ रस्त्यावरील निखार लेडीज शाॅपजवळ मनीषा चेतन सोनार यांना एक तीन वर्षांचा मुलगा दिसला. सोनार यांनी त्याच्याबरोबर कोण आहे का ?, याचा शोध घेतला. मात्र, त्याच्या पालकांचा शोध न लागल्याने त्यांनी त्वरीत या घटनेची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी प्रतिक्षा पानसरे, सचिन पवार यांना दिली. त्यांनी याबाबततची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना दिली. शहरातून बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान माेहीम राबविण्यात येत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in