मार्केट यार्डातील कुरिअर कंपनीवर दरोडा घालणाऱ्या टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. नवनियुक्त पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील पाच गुंड टोळ्यांच्या विरोधात मोक्का कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : नायलाॅन मांजामुळे अग्निशमन दलाचा जवान जखमी; गळ्याला दुखापत; गुलटेकडीतील घटना

टोळी प्रमुख अविनाश रामप्रताप गुप्ता (वय २०, रा. वेदगौरव सोसायटी, शिवणे), दीपक ओमप्रकाश शर्मा (वय १९, रा. राहुलनगर, शिवणे), आदित्य अशोक मारणे (वय २८), अजय बाबू दिवटे (वय २३), विशाल सतीश कसबे (वय २०, तिघे रा. मंगळवार पेठ), गुरजनसिंग सेवासिंग विरग (वय २२, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), संतो, बाळू पवार (वय २३), साई राजेंद्र कुंभार (वय १९, दोघे रा. खानापूर, ता. हवेली) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. अविनाश गुप्ता टोळीप्रमुख आहे. त्यांच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा >>>पुणे : पाणी बचतीसाठी पाणीबंद ठेवण्याची कल्पकता जी-२० च्या पाहुण्यांना दाखवावी; सजग नागरिक मंचाचा उपरोधिक टोला

मार्केट यार्ड परिसारतील कुरिअर कंपनीच्या कार्यालयात शिरुन गुप्ता आणि साथीदारांनी १२ नोव्हेंबर २०२२ रोजी दरोडा घातला. पिस्तुलातून गोळीबार करुन आरोपींनी २८ लाख रुपयांची रोकड लुटून नेली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करुन गुप्ता आणि साथीदारांना पकडले होते. या टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, सहायक निरीक्षक रामदास मुंढे, उपनिरीक्षक चेतन भोसले यांनी प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी गुप्ता आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाईचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police impose mcoca on gang robbed courier company in market yard pune print news rbk 25 zws