‘डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. कंपनीकडून घेतलेलं ६५ कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे गुन्हे शाखेने हे सर्क्युलर पाठवले गेले आहे.
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होते. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.
याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि त्याची देखील ३४ कोटीपर्यंत थकबाकी आहे. डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांनंतर पुणे पोलिसांनी हे लुक आउट सर्क्युलर जारी केलेलं आहे.
Maharashtra | A look out circular has been issued against BJP leader Nitesh Narayan Rane and his mother by Pune City Police on Sept 3, in a loan-related case in the DHFL matter.
— ANI (@ANI) September 9, 2021
३ सप्टेंबर रोजी ही लुकआउट नोटिस पाठवली गेली आहे. हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील पाठवलेलं आहे. मात्र, लुकआट सर्क्युलर जारी होणं म्हणजे आरोपी आहे असं होत नाही. तरी देखील या लुकआउट सर्क्युलरवर आता राणे कुटुंबियांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
पुणे गुन्हे शाखा आयुक्तांचं असं म्हणणं आहे की, आमच्याकडे तक्रार आली होती व त्यानंतर संबंधित न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर लुकआउट सर्क्युलर जारी केलं गेलं आहे. आम्ही नियमांचे पालन केले आहे व नियमाप्रमाणे जी थकबाकी आहे ती पाहता डीएचएफएलकडून तक्रार करण्यात आली होती.