पुणे : शहरातील उद्याने, टेकड्यांच्या परिसरात फिरायला येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांकडून दररोज सकाळी आणि सायंकाळी गस्त घालण्यात येणार आहे. नागरिकांची सुरक्षा तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी पोलिसांनी ‘माॅनिंग वाॅक’ उपक्रम सुरू केला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. रेल्वे, बस स्थानके, बाजारपेठा, नागरिकांची व्यायाम आणि फिरण्याच्या ठिकाणी पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दररोज सकाळी आणि सायंकाळी पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. शहरातील ३२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ८५ ठिकाणी पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे.

हेही वाचा – पुणे : अभियोग्यता चाचणीचा निकाल २४ मार्च दरम्यान; राज्य परीक्षा परिषदेचे स्पष्टीकरण

सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, रंजनकुमार शर्मा, उपायुक्त संदीपसिंह गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशीकांत बोराटे, विक्रांत देशमुख यांच्यासह सर्व विभागांतील सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा – गरवारे मेट्रो स्थानक परिसरातून बांधकाम साहित्य चोरीस

शहरातील उद्याने, टेकड्या, कॅनोल रस्ता परिसरात महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यातील अधिकारी सहभागी होणार असून, नागरिकांशी संवाद साधणार आहेत, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police morning walk and patrolling hills park areas and interacting with citizens pune print news rbk 25 ssb