पुणे : मुंढवा भागातील गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडील मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडले. चोरट्याकडून ३१ मोबाइल संच जप्त करण्यात आले. सतीश देवा हिरेकेरुर (वय ३६, रा. टाटा सोसायटी, विकासनगर, घोरपडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गणेशोत्सवात मुंढवा भागातील मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. गर्दीत नागरिकांचे मोबाइल संच चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे.

हेही वाचा : महिलेला धमकावून विनयभंग; माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाविरूद्ध गुन्हा

tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
cyber fraudsters, Eight people arrested ,
सायबर फसवणूक करणाऱ्यांना मदत केल्याप्रकरणी आठ जणांना अटक
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ

हिरेकेरुर याने नागरिकांची मोबाइल संच चोरल्याची माहिती तपास पथकातील कर्मचारी दिनेश भांदुर्गे, महेश पाठक यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून ३१ मोबाइल संच जप्त करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप जोरे, उपनिरीक्षक धनंजय गाडे, दिनेश राणे, दिनेश भांदुर्गे, महेश पाठक, वैभव मोरे, राहुल मोरे, सचिन पाटील, स्वप्नील रासकर आदींनी ही कारवाई केली.