शहरातील वाढते अपघात, रात्री अपरात्री मद्य पिऊन भरधाव वेगाने वाहने चालविण्यामुळे होणारे गंभीर अपघात, तसेच बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आता पोलिसांकडून दररोज मध्यरात्री शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नाकाबंदी करून वाहनचालकांच्या बेशिस्तीला वेसण घालण्याचा प्रयत्न, मोहीम चांगली आहे. वाहनचालकांनी किमान वाहन चालविताना नियमांचे पालन केल्यास शहरातील वाहतुकीचे प्रश्न बऱ्यापैकी सुटतील आणि गंभीर अपघातांचे प्रकारही कमी होतील. पोलिसांनी कारवाईत सातत्य ठेवले तर, वेगाची ‘नशा’ उतरण्यास वेळ लागणार नाही…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मद्यपी वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतेच दिले. त्यानंतर शहरात दररोज रात्री नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईसाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील महत्त्वाची २७ ठिकाणे निश्चित केली आहेत. बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री अकरा ते पहाटे तीनपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह १२५ पोलीस कर्मचारी सहभागी झाले असून, बेशिस्त वाहनाचालकांना शिस्त लावण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> कल्याणीनगरमधील ‘बॉलर’ पबच्या मालकाविरुद्ध गुन्हा; कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याशी हुज्जत

पोलिसांनी नाकाबंदी सुरू केल्यानंतर शहरात पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या दोन घटना घडल्या. वाहनचालकांनी नाकाबंदीत तपासणी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वाहनचालकांनी धक्काबुक्की केली. याप्रकरणी येरवडा आणि बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. शहरात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या घटना नित्याच्या आहेत. किरकोळ वादातून वाहनचालक पोलिसांना धक्काबुक्की करतात. कारवाई विरोध करताना प्रकरण हमरी तुमरीवर येते. अशा घटनांमध्ये चूक पोलिसांची किंवा वाहनचालकांची हे तपासणे गरजेचे ठरते. मूळात रस्त्यावर वाहतूक नियोजन करणे तसे सोपे काम नाही. प्रत्येक वाहनचालकाची मानसिकता वेगवेगळी असते. वाहनचालकांप्रमाणे गर्दीत उभे राहून वाहतूक नियोजन करणारे पोलीसही मेटाकुटीला येतात. त्यातून प्रकरण वादावादीपर्यंत जाते. मूळात वाहनचालकांनी वाहतूक नियमन करणे गरजेचे आहे. पोलिसांवर आरोप करण्यापेक्षा वाहनचालकांनी नियमांचे पालन केल्यास बऱ्यापैकी वादावादीच्या घटनाही घडणार नाहीत. समाज माध्यमातील घडामोडींचे बारकाईने अवलोकन केल्याने अनेकांना कायद्याचे ज्ञान वाढीस लागले आहेत. समाज माध्यमातील चित्रफिती पाहून साक्षर झालेले पोलिसांना कायद्याचे ज्ञान शिकवितात. कारवाईचे मोबाइलवर चित्रीकरण करतात. वरिष्ठ, तसेच राजकीय नेत्यांशी ओळखी असल्याचे सांगून पोलिसांशी वाद घालतात. वाद घालण्यापेक्षा नियमांचे पालन करून सौम्य भाषेत पोलीस, तसेच वाहनचालकांनी संवाद साधल्यास रस्त्यावरच्या वादाच्या घटनाही कमी होतील.

हेही वाचा >>> बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?

पोलिसांशी वाद, दाखल होणारे गुन्हे या घटना पूर्णत: वेगळ्या आहेत. मूळात रात्री अपरात्री दारू पिऊन वाहन चालविणे हा गंभीर गुन्हा आहे, याची जाणीव अनेकांना नसते. वेगाची नशा डोक्यात गेली की, गंभीर अपघात घडतात. १९ मे रोजी कल्याणीनगर भागात एका बांधकाम व्यावसायिकाच्या मोटाराचालक अल्पवयीन मुलाने दुचाकीस्वार संगणक अभियंता तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला धडक दिली. अपघातात दोघांचे मृत्यू झाले. या घटनेचे संतप्त पडसाद उमटले. बांधकाम व्यावसायिक वडील, त्याची आई, आजोबांनी मुलाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी मुलाला वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न हे प्रेमापाेटी केले होते. मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केले. ससूनमधील डाॅक्टरांना लाखो रुपये मोजले. मुलाबरोबर मोटारीत असलेल्या चालकाला डांबून ठेवले. त्याच्यावर दबाब आणला. मुलाला वाचविण्यासाठी केलेल्या गंभीर गुन्ह्यांमुळे अपघातानंतर सहा महिन्यांपासून त्यांना जामीन मिळाला नाही. येरवडा कारागृहात मुलाचे आई, वडील, ससूनमधील डाॅक्टर आहेत. नियमांचे पालन केले असते, तर हे सारे घडले असते का ?… – rahul.khaladkar@expressindia.com