पिंपरी : औंध जिल्हा रुग्णालयाजवळ डोक्यात दगड घालून झालेल्या तरूणाच्या खुनाचा गुंडा विरोधी पथकाने २४ तासात उलगडा केला. आरोपीने दिलेल्या कुरिअरच्या डिलिव्हरीवरून शिताफीने तपास करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असणार्‍या दोन आरोपींना वाशिम येथून जेरबंद करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पप्पू उर्फ जितेंद्र त्रिपाठी (रा. अहोदा, जि. चित्रकूट, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. शिव मंगल सिंग (वय ३८), सोमदत्त मनमोहन दुबे (वय २२, दोघे रा. उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. औंध जिल्हा रुग्णालयाजवळ एकाचा डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. गुंडा विरोधी पथकाकडून गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना मयत पप्पू सोबत दोघेजण दुचाकीवर जात असल्याचे दिसले. त्यातील एकाच्या हातामध्ये पांढर्‍या रंगाची पार्सलची पिशवी होती. ते कोठे जात आहे हे सीसीटीव्हीमार्फत पाहिले असता तो कृष्णा चौकातील कुरिअरच्या कंपनीमध्ये गेल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार, माहिती घेतली असता तो शिव सिंग असल्याचे समजले.

हेही वाचा >>> कर्वे रस्त्यावर पुन्हा अपघात;डंपरच्या धडकेत तरुणीचा मृत्यू , अपघातानंतर डंपरचालक पसार

त्याचे लोकेशन तपासले असता आरोपी अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर येथे एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले असल्याचे समजले. पथकाने त्याठिकाणी जाऊन माहिती घेतली असता दोघे आरोपी ट्रॅव्हल्सने उत्तरप्रदेश येथे जात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी वाशीम येथे शेलु टोल प्लाझा येथे ट्रॅव्हल बस अडवून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे तपास केला असता दोघांनी सततच्या होणार्‍या भांडणाच्या कारणावरुन नायलॉन दोरीने गळा आवळून तसेच डोक्यात दगड घालून।मित्र पप्पू त्रिपाठी याचा खुन केल्याचे कबुल केले.

हेही वाचा >>> प्रदूषण करणाऱ्या कंपनीचे वीज, पाणी बंद करा! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका

सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने, फौजदार अशोक जगताप, सहायक फौजदार पी. पी. तापकीर, एस. एन. ठोकळ, व्ही .एच. जगदाळे, हवालदार जी. डी.चव्हाण, एस. डी. चौधरी, ए. पी. गायकवाड, बी.टी. गंगीरे, जी. एस. मेदगे, के. पी. वाळंजकर, एस. पी. बाबा, एन. बी. गेंगजे, आर. के. मोहीते, एस. पी. घारे,एस. टी. कदम, टी. ईं. शेख, व्ही. एन. वेळापुरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police open murder case on courier delivery pune print news ggy03 zws