पुणे : बदलापूर येथील अत्याच्याराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांकडून शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शाळा, महाविद्यालयातील सुरक्षा, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची माहिती, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर चर्चा करण्यात येणार आहे.
कोलकाता येथे डॉक्टर तरूणीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. कोलकात्यातली घटना ताजी असतानाच बदलापूरमधील शाळेत मुलीवर अत्याच्यार केल्याची घटना उघडकीस. बदलापूरातील घटनेनंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. या घटनेनंतर शाळा, महाविद्यालयातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. राज्य शासनाने शाळा, महाविद्यालय प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा…राज्यातील शिक्षण विस्ताराकडे गांभीर्याने पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन आवश्यक- शरद पवार
पुणे पोलिसांकडून २९ ऑगस्ट रोजी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांतील प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठकीस उपस्थित राहणार आहेत, तसेच शाळा महाविद्यालयांचे प्राचार्य, प्रतिनिधी, शिक्षण विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहे. या बैठकीत शाळा, महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा,तसेच उपाययोजनांबाबत चर्चा केली जाणार आहे.
© The Indian Express (P) Ltd