पुणे : आदेश धुडकावून मोर्चा काढल्याप्रकरणी आझाद समाज पार्टीच्या ३०० कार्यकर्त्यांविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आझाद समाज पार्टीचे कार्याध्यक्ष भीमराव कांबळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष इब्राहिम तौसिफ शेख, लिगल सेलचे अध्यक्ष ॲड. तौसिफ शेख यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी प्रसाद पवार यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : पुणे: डोळे दिपवणाऱ्या लेझर प्रकाशझोतांवर दहीहंडीत बंदी ? सहपोलीस आयुक्तांकडून पुढील साठ दिवस ‘लेझर बीम’वर बंदीचे आदेश

आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (२३ ऑगस्ट) परवानगी न घेता लष्कर भागातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्या. कोणतीही परवानगी न घेता मोर्चा काढणे, तसेच तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्याप्रकरणी आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

Story img Loader