पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातून गहाळ, तसेच चोरीला गेलेल्या ३० मोबाइल संच पोलिसांनी परत मिळवले. गहाळ झालेले ३० मोबाइल संच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. मोबाइल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. गर्दीच्या ठिकाणांहून मोबाइल संच गहाळ होणे, तसेच चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. मोबाइल गहाळ झाल्यानंतर परत मिळण्याची शाश्वती नसते. मोबाइल माहिती, छायाचित्रांचा गैरवापर होऊ नये म्हणून नागरिक तक्रार देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कोणत्या फटाक्यांमुळे नेमकं किती प्रदूषण ? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चाचणीचे धक्कादायक निष्कर्ष

मोबाइल चोरी, तसेच गहाळ झाल्याच्या तक्रारी डेक्कन पोलिसांकडे आल्या होत्या. पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाकडून मोबाइल संचांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी उमा पालवे, सरोजा देवर, सुप्रिया सोनवणे यांच्या पथकाने हरवलेल्या मोबइलची माहिती संकलित करून तांत्रिक तपास सुरू केला. हरवलेले मोबाइल संच राज्यातील वेगवेगळ्या भागात वापरात असल्याचे तांत्रिक तपासात निदर्शनास आले. त्यानुसार मोबाईलचा आयएमईआय क्रमांक आणि तांत्रिक तपास करून पोलिसांनी गहाळ झालेल्या ३० मोबाइल संचांचा शोध घेतला. गहाळ झालेले मोबाइल वापरणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधून मोबाइल संच त्वरीत डेक्कन पोलीस ठाण्यात आणून देण्याच्या सूचना दिल्या. मोबाइल संच परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर पोलीस ठाण्यात मोबाइल संच परत करण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police return lost mobile sets to citizens on diwali occasion pune print news rbk 25 zws