स्पेनच्या राफेल नदालने रविवारी (३० जानेवारी) ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले आणि विक्रमी २१व्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदावर दिमाखात नाव कोरले. विशेष म्हणजे ही स्पर्धा यंदा जगभरात आणखी एका कारणासाठी चर्चेत राहिली. हे कारण म्हणजे दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचचा व्हिसा रद्द झाल्यानं. त्यामुळे जोकोविचचं आव्हान एकही सामना न खेळात संपुष्टात आलं. हाच धागा पकडून पुणे पोलिसांनी (Punne Police) नदाल आणि चोकोविचचा फोटो ट्वीट करत पुणेकरांना खास पुणेरी सल्ला दिला. या सल्ल्यात त्यांनी अप्रत्यक्षपणे जोकोविचला देखील टोला लगावला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे पोलिसांनी केलेल्या ट्वीटमध्ये ‘नो व्हॅक्सिन नो ट्रॉफी’ (No Vaccine No Trophy) या हॅशटॅगसह टेनिसपटू राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविचचा फोटो ट्वीट करण्यात आला. तसेच तुमची करोना विरोधी लस आजच घ्या असं आवाहनही करण्यात आलं.

ट्वीटचा नेमका संदर्भ काय?

नोव्हाक जोकोविच हा टेनिसमधील दिग्गज खेळाडू आहे. तो यंदाच्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला आला. मात्र, त्याने करोना लस न घेताच ऑस्ट्रेलियात प्रवेश केल्याचा ठपका ठेवत ऑस्ट्रेलिया सरकारने त्याचा व्हिसा रद्द केला. याविरोधात जोकोविचने कोर्टाचाही दरवाजा ठोठावला. मात्र, सरकारने नियमांचं उल्लंघन झाल्याचं सांगत आपल्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे नोव्हाक जोकोविचला प्रतिष्ठित ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी न होताच माघारी परतावं लागलं.

हेही वाचा : पुणेकरांनो सावधान… शहरामध्ये ‘टायर पंक्चर रॅकेट’चा भांडाफोड; समोर आली धक्कादायक माहिती!

पुणे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर लसीवरून घडलेली हीच घटना लक्षात घेऊन पुणेकरांना खास पुणेरी शैलीत लसीकरणाचं महत्त्व समजाऊन सांगितलंय. नोव्हाक जोकोविचसारख्या इतक्या दिग्गज खेळाडूला देखील लसीशिवाय ट्रॉफी जिंकता आली नाही. त्यामुळे नो व्हॅक्सिन, नो ट्रॉफी हा नियम सिद्ध झाला. त्यामुळे पुणेकरांनी देखील कोणत्याही निर्बंधांना सामोरं जाण्याआधी आजच आपली लस घ्यावी, असाच काहीसा संदेश पुणे पोलिसांनी दिलाय.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police sarcastic tweet about vaccination with photo of novak djokovic and rafael nadal pbs