पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह साथीदारांना मुंबई पोलिसांच्या ताब्यातून घेण्यासाठी पुणे पोलिसांनी सोमवारी न्यायलयात अर्ज दाखल केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी यांना ललितला पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी वॉरंट (प्रॉडक्शन वॉरंट) बजाविले आहे. ललितला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : सिंहगड रस्त्यावर धायरीमध्ये तरुणावर गोळीबार

ललित पाटीलसह साथीदार शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी आणि विक्री प्रकरणात ललितसह साथीदारांना अटक केली. ललितविरुद्ध अमली पदार्थ विक्री, तसेच ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल आहेत. ललित ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर त्याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात ललितसह साथीदार शिवाजी, राहुल यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाला लुटले; जळगावमधील चोरटे गजाआड

ललितच्या नाशिकमधील अमली पदार्थ निर्मिती कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. मेफेड्रोन तयार करण्यासाठी आरोपी शिवाजी कच्च्या मालाचा पुरवठा करत होता. आरोपी राहुल मेफेड्रोन तयार करत होता. ललितचा साथीदार रेहान उर्फ गोलू अन्सारी मेफेड्रोनची विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. ललितला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी सोमवारी न्यायलायत अर्ज सादर केला. न्यायालयाने ललितसह साथीदारांना ताब्यात घेण्यास वॉरंट बजावले आहे. दरम्यान, अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितची मैत्रीण ॲड. प्रज्ञा कांबळे, साथीदार अरविंद लोहरे,  रेहान उर्फ गोलू अन्सारी, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अऱ्हाना यांची पोलिस कोठडीची मुदत सोमवारी संपली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले.  न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune police to take custody of lalit patil from jail in mumbai pune print news rbk 25 zws
Show comments