पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्त्यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढून घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले. पुणे शहरातील विविध राजकीय पक्षाचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रतिष्ठित नागरिकांना पोलिसांकडून संरक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी पोलीस आयुक्तालयात अर्ज करावा लागतो. शहरातील ११० जणांना पोलिसांकडून संरक्षण (पोलीस प्रोटेक्शन) पुरविण्यात आले आहेत. पोलीस संरक्षण व्यवस्थेत ३५० जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.

शहरातील ११० जणांना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे. त्यापैकी ८५ जणांचे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस संरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
शहरातील संवेदनशील ठिकाणी ठेवण्यात आलेला पोलीस बंदोबस्त कायम राहणार आहे. ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता नव्हती. अशा २५ ठिकाणचा बंदोबस्त काढून घेण्यात आला आहे.

हेही वाचा…पुणेकरांना खुशखबर! मेट्रोचा लोणी काळभोरपर्यंत विस्तार शक्य; लवकरच निर्णय होणार

पुणे पोलिसांकडे ५४ जणांनी पोलीस संरक्षणासाठी अर्ज केले होते. त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. शस्त्र परवाना असलेल्या नागरिकांकडून पिस्तूल, रिव्होल्वर, बंदूक अशी शस्त्रे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.

Story img Loader