Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यातल्या पोर्श कारच्या धडकेत अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. हे दोघेही या अपघातात ठार झाल्यानंतर अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र तो अल्पवयीन असल्याने त्याला जामीन देण्यात आला. तर त्याच्या वडिलांना म्हणजेच पुण्यातल्या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली.

नेमकी काय घटना घडली?

मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार चालवत या मुलाने अनिश आणि अश्विनी यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. या अपघातानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर त्याचे वडील ओमप्रकाश अवधिया यांनी पोलीस आम्हाला सहकार्य करत नसल्याचं म्हटलं आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
deceased Raghunandan Jitendra Paswan
बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
passenger two-wheeler died, dumper hit Bopodi,
डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू, मुंबई-पुणे रस्त्यावरील बोपोडीत अपघात

अनिशचे वडील ओमप्रकाश अवधिया काय म्हणाले?

“अनिशचा अपघाती मृत्यू होण्याच्या एक दिवस आधी त्याचा आईला फोन आला होता. तो दुबईला जाऊन आला होता आणि विदेशात जाण्यासाठी त्याची तयारी सुरु होती. त्याची कंपनी त्याला विदेशात पाठवणार होती. मात्र त्याआधीच त्याचा अपघाती मृत्यू झाला. आमचा मुलगा अनिश कमवता होता. त्याच्या कमाईतूनच तो त्याच्या लहान भावाच्या शिक्षणाचा खर्च करत होता. आता तो कमवणारा हातच राहिला नाही. आता आम्ही काय करायचं?” असा उद्विग्न करणारा प्रश्न ओमप्रकाश अवधिया यांनी उपस्थित केला आहे. ANI या वृत्तसंस्थेला त्यांनी प्रतिक्रिया दिली.

हे पण वाचा- Pune Porsche Accident:दोन निष्पाप जीव घेणाऱ्या पोर्शचा वेग किती होता? पंचनाम्यात समोर आलं वास्तव

अनिश खूप मेहनत करुन नोकरीला लागला

“अनिश हा खूप मेहनती होता, त्याने पुण्यात डी. वाय. पाटील महाविद्यालयात इंजिनिअरिंग केलं आणि त्यानंतर नोकरी मिळवली. नोकरीतही तो खूप प्रामाणिकपणे काम करत होता. त्यामुळे त्याला चांगल्या संधी मिळाल्या. आमच्या मुलाला महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून आम्हाला बरेच कष्ट घ्यावे लागले होते. १९ तारखेच्या एक दिवस आधीच त्याने आईला फोन केला होता, की मला कंपनी विदेशात पाठवणार आहे. १९ तारखेला त्याचा वाढदिवस होता म्हणून तो पार्टी करायला गेला होता. रात्री २-३ च्या सुमारास त्याच्या आईचा फोन आला की अनिशचा अपघात झाला. त्यानंतर फोन आला की तो वारला. मला पुण्यालाही बोलवून घेतलं.” अशी माहिती ओमप्रकाश अवधियांनी दिली.

पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने सहकार्य केलं नाही

“आम्हाला ही माहिती मिळाली की आमच्या मुलाला ज्या कारने उडवलं ती कोट्यवधींची गाडी होती. एक अल्पवयीन मुलगा ती कार चालवत होता. त्याचं वय १७ वर्षे आहे. त्याच्यासह एकूण चारजण कारमध्ये बसले होते आणि सगळे मद्यधुंद अवस्थेत होते असंही आम्हाला समजलं आहे. आमचा मुलगा आमचा आधार होता. आता तोच हरपला आहे त्याची भरपाई होऊ शकते का? ज्या दिवशी अपघात झाला तेव्हा आम्हाला कुणाचंही सहकार्य मिळालं नाही. पोलिसांना लाख रुपये वाटण्यात आल्याचंही माझ्या कानांवर आलं. पण आमच्या दुसऱ्या मुलाला विनाकारण त्रास देण्यात आला. पोलीस किंवा रुग्णालय प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं नाही.” असाही आरोप ओमप्रकाश अवधियांनी केला आहे.

https://x.com/ANI/status/1792851838196457830
https://x.com/ANI/status/1792849305084346829

अनिशच्या आजोबांनीही केला आरोप

आमचा नातू शिकायला गेला होता. दोन ते तीन वर्षांपासून चांगली नोकरी करत होता. त्याने लहान भावालाही तिथेच बोलून घेतलं होतं. १९ तारखेला तो पार्टी करुन परतत होता तेव्हा कारने त्याला धडक दिला. ज्याने आमच्या नातवाला कारने धडक दिली तो मुलगा अल्पवयीन होता आणि बेदरकारपणे कार चालवत होता. पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं नाही असा आरोप अनिशचे आजोबा आत्माराम अवधियांनीही केला आहे.