पुण्यामध्ये शनिवारी रात्री आलिशान पोर्श कार बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. पुण्यासह संपूर्ण देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने (साडेसतरा वर्षे) त्याच्या मित्रांसह अपघाताआधी दोन पबमध्ये जाऊन मद्यप्राशन केलं होतं. दरम्यान, अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहायची शिक्षा देऊन न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. तर अपघातानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. आज (२२ मे) पोलीस त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जात होते. यावेळी वंदे मातरम या संघटनेने आरोपीवर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना अडवलं.

वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या तोंडावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं आणि आरोपी बचावला. दरम्यान, कार्यकर्ते शाईफेक करू शकले नसले तरी त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले, “आरोपीला मोक्का या कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे. या बिल्डरवर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत आणि आता त्याच्या मुलाने हा किळसवाणा प्रकार केला आहे.”

Financial misappropriation case, acquittal ,
आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण : भावना गवळी यांच्या निकटवर्तीयाची दोषमुक्तीची मागणी फेटाळली
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Sessions Court observation while denying bail to driver Sanjay More in Kurla BEST bus accident case Mumbai news
आरोपीच्या निष्काळजीपणामुळेच ‘बेस्ट’ अपघात; चालक संजय मोरे याला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण
Four dead in Gujarat due to kite string injuries
नायलॉन मांजामुळे सात जणांचा मृत्यू; मुंबईत १९ जणांविरोधात कारवाई
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नायलॉन मांजाप्रकरणी मुंबईत १९ गुन्हे
nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा

वंदे मातरम संघटनेतील एक आंदोलक कार्यकर्ता म्हणाला, “या बिल्डरच्या मुलाने त्याला सांगितलं होतं की मी मित्रांबरोबर पार्टी करायला जातोय. तरीसुद्धा त्याने मुलाला आपल्या महागड्या कारची चावी दिली. ती गाडी घेऊन त्याच्या मुलाने दोन निष्पाप मुलांचा जीव घेतला. त्यामुळे आम्ही या आरोपीचं तोंड काळं करायला इथे आलो होतो. परंतु, पोलिसांमुळे आम्ही ते करू शकलो नाही. मात्र आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहोत. आरोपीचा मुलगा, त्याचे मित्र ज्या पब आणि बारमध्ये दारू प्यायला बसले होते. त्या पबवर, बारवर देखील कारवाई व्हायला हवी. त्याच्याबरोबर दारु प्यायला बसलेले त्याचे इतर मित्र जर अल्पवयीन असतील तर त्यांच्या पालकांवरही कारवाई करायला हवी. तसेच रात्री ११ नंतर जे पब आणि बार चालू ठेवले जातात त्यांचे परवाने रद्द करायला हवेत.”

हे ही वाचा >> “रावण डॅशिंग होता म्हणून…”, पटोलेंच्या आदित्यनाथांवरील टीकेला आठवलेंचं उत्तर; म्हणाले, “रावणाने लंका जाळली…”

आंदोलक म्हणाले, “आम्ही या बिल्डरला धडा शिकवायला इथे आलो होतो. परंतु, पोलिसांमुळे तो बचावला. त्याच्यावर हल्ला करण्याचं आमचं उद्दिष्ट होतं. आम्ही त्याचा तोंड काळं करायला इथे आलो होतो. कारण त्याच्या मुलाने दोन निष्पाप जीव घेतले आहेत. त्या मुलांचे आई-वडील आता त्यांच्या लेकरांना पाहू शकणार नाहीत. त्यामुळे या आरोपीचं तोंड काळं करून समाजाला दाखवायचं होतं. तसेच याच्यावर मोक्का या कायद्याअंतर्गत कारवाई करा अशी आमची मागणी आहे. हा बिल्डर कोणत्यातरी छोटा राजन, दाऊद इब्राहिमसारख्या गुंडांच्या टोळीशी संबंधित असला तरी आम्हाला त्याने काही फरक पडत नाही. या गुन्ह्याला त्या मुलापेक्षा त्याचा बापच जास्त जबाबदार आहे. त्याने मुलाला कारची चावी देऊन ही हत्या घडवली आहे. तसेच ज्या पबमध्ये ही मुलं दारू प्यायले, त्या पबवर देखील कारवाई व्हायला हवी. त्या दोन्ही पबचे परवाने रद्द करायला हवेत. नियम न पाळणाऱ्या पबवर आणि बारवर निर्बंध आणायला हवेत. ओळखपत्र तपासल्याशिवाय लहान मुलांना मद्य उपलब्ध करून देऊ नये. नियमांचं पालन व्हायला हवं अशी मागणी आम्ही वंदे मातरम संघटनेच्या माध्यमातून करत आहोत. वंदे मातरम संघटनेने आज केवळ ट्रेलर दाखवला आहे. जर या आरोपीवर कारवाई झाली नाही तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही.”

Story img Loader