Pune Porsche Crash Latest Updates : पुण्यातील कल्याणीनगर येथे भीषण अपघातात दोन तरुणांचा हाकनाक बळी गेला. पोर्श या गाडीने या जोडप्याच्या दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात घडला. ही पोर्श गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डरचा हा मुलगा असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, पुण्यातील ही प्रसिद्ध व्यक्तिमत्व असल्याने त्यांना या प्रकरणात व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जातोय. तसंच, या अल्पवयीन मुलाचे मद्यप्राशन करतानाचेही व्हिडिओ समोर येत आहे. यावरून पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे.
“या प्रकरणाच्या तपासणीसाठी पथक नेमण्यात आले आहे. युद्धपातळीवर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. सामग्री, अल्कोहोल आदी सर्व दृष्टीकोनातून चौकशी करण्यात येणार. या प्रकरणातील कोणताही निगेटिव्ह रिपोर्ट आलेला नाही. ब्लडचे रिपोर्ट आलेले नाहीत”, असं पोलीस आयुक्त म्हणाले.
#WATCH | On the Pune car accident case, Pune CP Amitesh Kumar says, "…We have adopted the most stringent possible approach and we shall do whatever is at our command to ensure that the two young lives which were lost get justice and the accused gets duly punished…" pic.twitter.com/fl9wxwosI7
— ANI (@ANI) May 21, 2024
दरम्यान, आरोपी मद्यप्राशन करत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबाबत विचारले असता पोलीस आयुक्त म्हणाले, “आरोपीने मद्यप्राशन केले होते, दोन्ही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. त्यात ते मद्यप्राशन करताना दिसत आहेत. त्यांनी ऑनलाईन पेमेंट केलं आहे. ही दारूची ऑनलाईन पेमेंट आहेत. यातून स्पष्ट झालंय की त्यांनी मद्यप्राशन केलं होतं. परंतु, रक्ताचा अहवाल आल्यानंतरच याचा खुलासा होईल.”
हेही वाचा >> पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी स्थानिक आमदाराचा पोलिसांवर दबाव? सुनील टिंगरे यांनी संपूर्ण घटनाक्रमच मांडला!
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोन आले होते. पोलीस महासंचालक यांनीही सूचना दिली आहे. सर्वांची सूचना स्पष्ट आहे की पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागेल. प्रशासकीय कारवाई करत नाही तोवर दोषी आहेत त्यांच्याविरोधात कडक कारवाई व्हायला पाहिजे”, असंही ते म्हणाले.
दरम्यान, पुढील निर्णय येईपर्यंत अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्याबाबतही न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. परंतु, हा अर्जही न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे, संबंधित आरोपीला प्रौढ आरोपीनुसार कलम ३०२ (हत्येचा गुन्हा) लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशीही माहिती अमितेश कुमार यांनी दिली.
मैं इसीलिए कहता हूं, साधो ये मुर्दों का देस,
— ANIL (@AnilYadavmedia1) May 21, 2024
वेदांत अग्रवाल ने बार में शराब पी, और अपनी Porsche कार से दो लोगों को कुचलकर मार दिया,
पुलिस और डॉक्टरों ने मोटा माल लिया और मेडिकल में वेदांत अग्रवाल को दारू ना पीने की रिपोर्ट दी,
छुट्टी के दिन जज ने मुकदमा सुना और तीन सौ शब्द… pic.twitter.com/x879iDpMeV
आरोपीच्या वडिलांसह बार मालक आणि मॅनेजरला अटक
पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणी आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनंतर आता बार मालकासह मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. आरोपी १७ वर्षांचा अल्पवयीन असताना त्याला दारु देण्यात आली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.