Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यातल्या कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही महागडी कार चालवून दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. हा मुलगा पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. अपघात झाल्यानंतर या मुलाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्याला अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून जामीन दिला होता. ज्यानंतर पुण्यात आणि समाजमाध्यमांवर राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर या अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. या अल्पवयीन मुलाने ज्या दोघांचा उडवलं त्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचे पालक अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. अशात या अल्पवयीन मुलाला आता जामीन मंजूर झाला आहे.

नेमकी घटना काय घडली?

१७ वर्षे आठ महिने वय असलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत ताशी १६० किमीच्या वेगाने पोर्श कार अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अश्विनीचा जागीच मृत्यू झाला. तर अनिशला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. अनिश अवधिया हा २४ वर्षांचा तरुण होता. पुण्यात त्याने इंजिनिअरिंग केलं होतं. तसंच मागच्या काही वर्षांपासून आयटी विभागात काम करत होता. तर अश्विनी कोस्टा त्याची चांगली मैत्रीण होती. दोघेही एकाच कंपनीत काम करत होते. मित्रांसह डिनरला गेले होते. हे दोघे बाईकवरुन निघाले त्यानंतर काही सेकंदातच भरधाव वेगात आलेल्या पोर्शने या दोघांना धडक दिली. ज्यात या दोघांचा मृत्यू झाला.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
rumor, Vishal Agarwal absconding, pimpri chinchwad police, porsche car accident
विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार? पिंपरी चिंचवड पोलिसांनी केला खूलासा…
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
Leopard in Rashtrapati Bhavan
Video: मोदींचे मंत्री शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनात दिसला बिबट्या? मंचाजवळून ऐटीत चालत गेला अन्…
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत

सुरुवातीला मिळाला जामीन

ज्या मुलाने अपघात घडवला त्याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अपघात कसा घडला यावर ३०० शब्दांचा निबंध लिही हे सांगून जामीन मंजूर करण्यात आला होता. हा निर्णय समजल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजातून या मुलावर आणि ३०० शब्दांचा निबंध लिही सांगणाऱ्या न्यायाधीशांवर चांगलीच टीका झाली. तसंच गरीबाच्या मुलालाही इतकं सहज सोडलं गेलं असतं का? असे प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर या मुलाला सुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. त्याची मुदत २५ जून होती. त्याला सोडण्यात यावं या याचिकेसाठी जो युक्तिवाद झाला त्यात कोर्टाने हे मत मांडलं की त्या मुलावरही आघात झाला. आता या मुलाला आज जामीन मंजूर झाला आहे.