पुणे : कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्श मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत होती. बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून पुण्यात ही मोटार आणण्यात आली. त्यानंतर एप्रिलमध्ये या मोटारीची नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुरू करण्यात आली. परंतु, १ हजार ७५८ रुपयांचे शुल्क न भरल्याने कोट्यवधी रुपये किंमत असलेल्या या मोटारीची नोंदणी अद्याप पूर्ण झालेली नाही.

कल्याणीनगरमध्ये अल्पवयीन मुलगा पोर्श मोटार चालवीत होता. तो मोटार भरधाव चालवीत असताना तिची धडक बसून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला होता. हा अपघात घडला त्या वेळी मोटारीला नोंदणी क्रमांक नव्हता. ही मोटार बंगळुरूमधून खरेदी करण्यात आली होती. या मोटारीची किंमत पावणेदोन ते अडीच कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. तेथील वितरकाने या मोटारीची तात्पुरती नोंदणी करून ती पुण्यात पाठविली. मोटारीची तात्पुरती नोंदणी १८ मार्चला झाली होती. या नोंदणीची मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वैध आहे, अशी माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली.

Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BMTC bus driver heart attack death
प्रवाशांनी भरलेली बस चालवताना ड्रायव्‍हरचा हार्ट अटॅकने मृत्‍यू; कंडक्टरच्या एका कृतीनं अनर्थ टळला, थरारक VIDEO व्हायरल
Skoda Kylaq SUV launched In India
Skoda Kylaq :स्कोडाचा भारतीय मार्केटमध्ये धमाका! फक्त आठ लाखांत लाँच केली SUV; २५ सुरक्षा फीचर्समुळे अधिक सुरक्षित होईल
pick up tempo fell in creek while being loaded into boat in Raigad
Video : रायगडमध्ये बोटीत चढवतांना पिकअप टेम्पो खाडीत पडला… घटना सीसीटीव्हीत कैद
41 lost mobile returned to complainant by pune police on the occasion of diwali
हरवलेले ४१ मोबाइल संच तक्रारदारांना परत; दिवाळीनिमित्त पोलिसांकडून अनोखी भेट
Ahead of Assembly elections Bharari team seized Rs 2 crore 30 lakh from suspicious vehicle in Bhiwandi
भिवंडीत निवडणूक भरारी पथकाकडून दोन कोटीची रक्कम जप्त
Mercedes Benz Accident
Mercedes Benz Accident : मद्यधुंद अवस्थेत मर्सिडीज गाडी चालवत तरुणाने एका महिलेला चिरडले, आरोपी अटकेत

हेही वाचा >>>पुण्यातील अपघात प्रकरणी चौघे अटकेत; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह हॉटेल मालक, कर्मचाऱ्यांना बेड्या

पोर्श मोटार पुण्यात आल्यानंतर १८ एप्रिलला नोंदणीसाठी ती पुण्यातील आरटीओमध्ये नेण्यात आली. तिथे आरटीओतील निरीक्षकाने तिची तपासणी केली. त्या वेळी तिची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. या मोटारीची किंमत काही कोटी रुपयांच्या घरात असली, तरी ती इलेक्ट्रिक मोटार असल्याने नोंदणी शुल्क फारसे नाही. नोंदणीसह इतर शुल्क अशी केवळ १ हजार ७५८ रुपयांची रक्कम भरून ही नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत होती, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

पोर्शचे नोंदणीचे शुल्क (रुपयांत)

– बँक शुल्क – १५००

– नोंदणी प्रमाणपत्र – २००

– टपाल खर्च – ५८

– एकूण शुल्क – १७५८