Pune Accident : पुण्यामध्ये शनिवारी रात्री महागडी पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ट यांना धडक दिली. या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यासह राज्यभर उमटताना दिसत आहे. तसेच या प्रकरणात नवनवी माहिती रोज समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, पुण्यातील नामांकित बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने त्याच्या मित्रांसह अपघाताआधी दोन पबला भेटी दिल्या होत्या. त्यापैकी एका पबमध्ये ते ९० मिनिटे थांबले होते. केवळ दीड तासात अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी ४८ हजार रुपये उडवले होते.

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी शनिवारी रात्री १० वाजून ४० मिनिटांनी कोझी पबमध्ये प्रवेश केला होता. तिथे त्यांनी ९० मिनिटांत ४८ हजार रुपयांचे बिल केले. तिथून ते १२ वाजून १० मिनिटांनी ब्लॅक मॅरियट या दुसऱ्या पबमध्ये गेले, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. अमितेश कुमार यांनी वर्तमानपत्राला सांगितले की, आम्ही कोझी पबमधून ४८ हजारांचे बिल घेतले आहे. अल्पवयीन चालक आणि त्याच्या मित्रांनी कोणते मद्य घेतले त्यासाठी किती खर्च केले, याची माहिती आहे.

chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
pune incident of speeding car hitting couple on two wheeler on flyover in Gultekdi
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
youth on two wheeler seriously injured in collision with Pune bus
विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी; येरवड्यात अपघात
pune rto marathi news
पालकांनो सावधान…मुलांच्या हातात गाडी देताय ?
kalyan east attempt to murder
कल्याण पूर्वेत किरकोळ कारणावरून तरूणाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

“ऑनलाईन बिलांवरून स्पष्ट झालंय की…”, ‘त्या’ व्हायरल VIDEO बाबत पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टकरण

तसेच एनडीटीव्हीशी बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, अल्पवयीन चालकाला अपघाताच्या काही तासानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले असून त्याचा न्यायवैद्यक चाचणी अहवाल येणे बाकी आहे.

या प्रकरणात आम्ही आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेचे कलम ३०४ (अ) कलम दाखल केलेले नाही. तर ३०४ हे कलम लावले आहे. मद्यपान केल्यानंतर एका अरुंद रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवून इतरांच्या मृत्यूसाठी आपण कारणीभूत ठरू शकतो, हे माहीत असूनही सदर अल्पवयीन चालकाने हे कृत्य केले आहे. सहायक पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सागंतिले की, अल्पवयीन चालकाने दोन पबमध्ये जाऊन मित्रांसह मद्य रिचवले होते. त्यानंतर महागडी पोर्श कार चालवली. याबाबतचे सीसीटीव्ही चित्रण आमच्याकडे आहे. यामध्ये पबमध्ये आरोपी आणि त्याचे मित्र मद्य पिताना दिसत आहेत.

पोर्श धडकेत जागीच मृत्यू झालेल्या अश्विनीच्या वडिलांची सून्न करणारी प्रतिक्रिया, “आमची स्वप्नं..”

पुणे पोलिसांनी अल्पवयीन चालकाचे वडील आणि नामांकित बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे. तसेच दोन्ही पबमधील तीन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पबचालकांनी अल्पवयीन व्यक्तीला मद्य पुरविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, असे संकेत दिले आहेत. तसेच पोलीस महासंचालकांनीही आरोपींवर कारवाई करण्याबाबतचे निर्देश दिले असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले. पोलिसांवर काही दबाव आहे का? या प्रश्नावर बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, आम्ही कायद्याप्रमाणे कारवाई करत आहोत. आमच्यावर कुणाचाही दबाव नाही.

“पोर्श कार अपघातानंतर ‘त्या’ गोष्टी पुन्हा आठवल्या”; आमदार प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीची पोस्ट चर्चेत!

दरम्यान शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस ठाण्यात अल्पवयीन चालकाला पिझ्झा आणि बर्गर पुरविण्यात आला असल्याचाही आरोप त्यांनी केला. तसेच अजित पवार गटाचे आमदार अल्पवयीन चालकाची मदत करण्यासाठी पोलीस स्थानकात उपस्थित होते, असाही आरोप संजय राऊत यांनी केला.

Story img Loader