पुणे : कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही आलिशान कार चालवून अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना एका अल्पवयीन मुलानं चिरडलं. या घटनेला जवळपास ३५ दिवसांचा कालावधी उलटून गेला. त्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलास न्यायालयात हजर केल्यावर, अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगून जामीन देण्यात आला होता. त्या निर्णयांची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा याचिका दाखल केल्यावर, अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली.
हेही वाचा : पुणे पोर्श अपघात: आरोपीला जामीन मिळताच अश्विनी कोस्टाच्या आईची उद्विग्न प्रतिक्रिया; म्हणाल्या…
त्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत होती आणि अल्पवयीन मुलाचे वडील, आई, आजोबा, हॉटेल व्यवस्थापक, डॉक्टर यांना देखील अटक करण्यात आली. या सर्व घडामोडी दरम्यान आज न्यायालयामध्ये सुनावणी झाली. त्यावेळी आरोपी अल्पवयीन मुलास तात्काळ सोडण्याचे आदेश दिले. त्यानंतर पुढील काही तासांत पुण्यातील बालसुधार गृहामधून चोख पोलिस बंदोबस्तात आरोपी अल्पवयीन मुलास सोडण्यात आले.