Pune Porsche Car Accident Case: पुण्याच्या कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्श कार अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात कार चालवणाऱ्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या आरोपात ससून रुग्णालयातील तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आता ससून रुग्णालयातील अटक आरोपींपैकी एक डॉ. अजय तावरे यानं आता या प्रकरणातील इतरांचीही नावं उघड करण्याची धमकी दिली आहे.

कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची ससून रुग्णालयातच वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. यासाठी आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. त्या नमुन्यांच्या आधारेच आरोपीनं मद्यसेवन न केल्याचा अहवालही तयार करण्यात आला होता. मात्र, अल्पवयीन आरोपीनं मद्यसेवन केल्याचं सीसीटीव्ही अपघाताच्या आधीच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आलं. यानंतर रुग्णालयातील कर्मचारी आणि संबंधित डॉक्टरांची चौकशी केली असता आरोपीच्या रक्ताचे नमुनेच बदलण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली.

Mayni Medical College , Financial Misappropriation Mayni Medical College,
मायणी वैद्यकीय महाविद्यालय आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : दीपक देशमुख यांची अटक बेकायदा ठरवून जामिनावर सुटकेचे आदेश
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Baba Siddique murder case, Accused arrested from Ludhiana, Baba Siddique latest news, Baba Siddique marathi news,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : आरोपीला लुधियानातून अटक
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
Pune Porsche accident, minor driver friend,
पुणे पोर्शे अपघात : अल्पवयीन चालकाच्या मित्राच्या वडिलांनाही अटकपूर्व जामीन नाही
notorious chhota rajan granted bail by bombay high court
जया शेट्टी हत्या प्रकरण;कुख्यात छोटा राजनला उच्च न्यायालयाकडून जामीन;व्यावसायिक अन्य प्रलंबित खटल्यांमुळे तुरुंगातच मुक्काम
chandrakant handore
बेदरकारपणे गाडी चालवून दुचाकीस्वाराला धडक दिल्याचे प्रकरण : काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला उच्च न्यायालयाकडून दिलासा
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार

आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर आणि एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. नमुन्यांमध्ये फेरफार करण्यासाठी आरोपींनी लाखो रुपयांची लाच घेतल्याचीही बाब उघड झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालयातील अटक आरोपीने इतरही नावं उघड करण्याची धमकी दिली आहे.

Pune Porsche Accident : अपघाताआधी अल्पवयीन चालकाने पबमध्ये ९० मिनिटांत उडवले ४८ हजार रुपये, पोलिसांची माहिती

“शांत बसणार नाही”

फ्री प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार ससून रुग्णालयातून अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी आरोपी डॉ. अजय तावरेनं हा धमकीवजा इशारा दिला आहे. “मी शांत बसणार नाही, सगळ्यांना उघडं पाडेन”, असं अजय तावरेनं म्हटल्याचं या वृत्तामध्ये नमूद करण्यात आलं आहे. सध्या ससून रुग्णालयातून अटक केलेले तिधे आरोपी पोलीस कोठडीत असून सोमवारी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत ३० मे पर्यंत वाढ केली आहे.

कसा झाला अपघात?

१९ मे रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात रात्री २ ते अडीचच्या सुमारास हा अपघात घडला. शहरातील बडे उद्योगपती विवेक अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा त्याच्या मित्रांसमवेत पार्टी करून परत येत असताना ही घटना घडली. हा अल्पवयीन आरोपी पोर्श कार वेगाने चालवत जात होता. त्यावेळी त्यानं एक तरुण व एका तरुणीला कारने उडवलं. त्यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी सदर अल्पवयीन आरोपी मद्याच्या प्रभावाखाली होता, हे आता स्पष्ट झालं आहे.