१९ मे रोजी झालेल्या पुणे पोर्श अपघाताचं प्रकरण आणि या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत तसंच राजकीय आरोप-प्रत्यारोपही रंगले आहेत. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणात एका आमदाराच्या मुलाचा समावेश होता असा खळबळजनक आरोप केला आहे. तसंच या प्रकरणात दोषींनीा सरकार अभय देत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अल्पवयीन मुलाची रवानगी सुधारगृहात, वडील आणि आजोबा अटकेत

पुण्यात १९ मेच्या पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बाईकवरुन घरी जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडवलं. या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र १५ तासांत त्याला जामीन मिळाला. १५ तासांत त्याला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजात संताप व्यक्त झाला. १९ तारखेपासून या घटनेवर विविध पडसाद उमटत आहेत. समाजात हा विषय चर्चिला जातो आहे. अशात या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात आता नाना पटोलेंनी धक्कादायक आरोप केला आहे.

हे पण वाचा- Porsche Accident: “आम्ही पाहिलं ती मुलगी हवेत उडाली आणि धाडकन..”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार

नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

पुणे पोर्श अपघात प्रकरणात सापळे कमिटीची निर्मिती राज्य सरकारने केली. मात्र डॉ. सापळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याकडे भाडे तत्त्वावरची कार आहे. त्या कारचा देखभाल खर्च एक लाख रुपये आहे. अनेक ठिकाणी त्यांची बदली झाली होती. त्या त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचाराचे उच्चांक गाठले आहेत. पोर्श अपघात प्रकरणात दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ससून रुग्णालय, पोलीस विभाग आणि राज्यकर्त्यांचे लोक यांना वाचवण्यासाठी ही कमिटी निर्माण केली गेली आहे. असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

पोर्श प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी

पोर्श अपघात प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. मात्र सरकार यावर काहीही बोलण्यास तयार नाही. तीन दिवसांसाठी मुख्यमंत्री आराम करायला गेले आहेत. राज्य पेटतं आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री सुट्टीवर जात आहेत. आता लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा? भाजपाला इतके आमदार देऊन चूक झाली का? हा प्रश्न जनता विचारते आहे.

पोर्श अपघात प्रकरणात आमदार पुत्राचा समावेश असल्याचा नाना पटोलेंचा आरोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे सांगितलं पाहिजे की डॉ. तावरेंची नियुक्ती कुणाच्या सांगण्यावरुन झाली आहे? कुठल्या आमदाराने पोलीस आणि डॉक्टरांशी बोलत होते? त्या कारमध्ये कोण होतं? ते अजून कळलेलं नाही. ही नावं का लपवली जातात? पोर्श कार प्रकरणात ज्या पबमधून निघाली होती दोन कार्सची रेस लागली होती. या रेसमध्ये या पोर्शने दोन निरपराध जीव घेतले. आरोपींना निबंध लिहायला लावणं म्हणजे तर मोठी थट्टा आहे. असाही आरोप नाना पटोलेंनी केला आहे. कितीवेळा चिरडू शकता हे विचारायचं होतं का? असा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला आहे. या घटनेत आमदाराचा मुलगाही होता. आम्ही त्याचं नाव सांगणार नाही ते नाव सरकारने जाहीर करावं या प्रकरणात दोन उपमुख्यमंत्री आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत असाही आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune porsche car accident son of mla involve in accident case said congress leader nana patole scj
Show comments