पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली. अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल यांना रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी त्यांनी मदत केल्याचे तपासात उघड झाले आहे. दोघांच्या माध्यमातून अगरवाल ससूनमधील डाॅ. अजय तावरेच्या संपर्कात आल्याचे तपासात उघड झाले. आदित्य अविनाश सूद (वय ५२), आशिष सतीश मित्तल (वय ३६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदल प्रकरणात यापूर्वी अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील विशाल सुरेंद्र अगरवाल, आई शिवानी, ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा प्रमुख डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर, अश्फाक मकानदार, अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय मंगळवारी (२० ऑगस्ट) निर्णय देणार आहेत.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
abuse girl by delivery boy search for absconding accused is on
‘डिलिव्हरी बॉय’कडून मुलीशी अश्लील कृत्य; पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

हे ही वाचा… पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपला धक्का! भाजपचा नेता बांधणार ठाकरे गटाचे शिवबंधन

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला. भरधाव मोटारीच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर अल्पवयीन मुलाचे वडील विशाल याने ससूनमधील डाॅ. तावरेशी संपर्क साधला. त्यासाठी मकानदार, गायकवाड यांच्या माध्यमातून चार लाखांची रक्कम देण्यात आली होती. अगरवालचे परिचित आदित्य सूद, आशिष मित्तल यांची डाॅ. तावरेशी ओळख होती. त्यांच्या माध्यमातून अगरवालने डाॅ. तावरेशी संपर्क साधल्याचे तपासात उघड झाले. गुन्हे शाखेकडून सोमवारी रात्री उशीरा सूद आणि मित्तल यांना अटक करण्यात आली. दोघांना अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

हे ही वाचा… मंकीपॉक्सबाबत सरकारला अखेर जाग! ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर आरोग्य विभागाकडून तातडीने मार्गदर्शक सूचना जाहीर

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैेलैश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे आणि पथकाने ही कारवाई केली.