Pune Porsche Crash Latest Updates: पुण्यातल्या कल्याणी नगर भागात एका अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू या धडकेत झाला. या दोन निरपराधांचा बळी घेतल्यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र अवघ्या १५ तासांमध्ये त्याला जामीन मिळाला. ज्याचे पडसाद सोशल मीडियासह राज्यभरात उमटले. या मुलाची रवानगी सध्या बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात

सोशल मीडियासह पुणे आणि राज्यभरातून पोर्श अपघात प्रकरणावर जेव्हा संतप्त पडसाद उमटले त्यानंतर दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणात मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलाचे वडील पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
ravi rana replied to ajit pawar
“…तेव्हा ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ आठवली नाही का? आता परिणाम भोगा”; रवी राणांचं अजित पवारांना प्रत्युत्तर!
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले?

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार “पोर्श कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या रक्तचाचणीचा अहवाल महत्त्वाचा नाही. रक्त चाचणी अहवाल असो किंवा नसो हे प्रकरण असे आहे की अल्पवयीन मुलाला हे माहीत होतं की दारु पिणे आणि अरुंद रस्त्यावर भरधाव वेगाने कार चालवणं यामुळे लोकांचा मृत्यू होऊ शकतो. आम्ही या प्रकरणात कसून तपास करतो आहोत तसंच ठोस पुरावे गोळा करत आहोत. तांत्रिक पुराव्यांवर आम्ही लक्ष केंद्रीत करत आहोत.”

हे पण वाचा- Pune Porsche Accident: अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली, म्हणाली; “प्लीज..”

१९ मेच्या पहाटे अपघात, दोघांचा मृत्यू

पुण्यातल्या कल्याणी जंक्शन भागात १९ मेच्या पहाटे २.३० सुमारास मद्यधुंद अवस्थेत १७ वर्षीय मुलाने भरधाव वेगात पोर्श कार चालवत एका मोटरसायकलला धडक दिली. त्यात दोन इंजिनिअर्सचा मृत्यू झाला. येरवडा पोलीस ठाण्यात मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातानंतर आठ तासांनी मुलाच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. गुन्हा घडताना त्याने मद्यपान केले होते का? हे तपासण्यासाठी ते नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवले आहेत अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. अशात आता अमितेश कुमार यांनी मुलाला काय घडू शकतं याची कल्पना होती त्यामुळे रक्तचाचणी अहवाल महत्त्वाचा नाही असं म्हटलं आहे.

हे पण वाचा- Porsche Accident: “दोन बळी घेणाऱ्या मुलाला पिझ्झा, बर्गर कुणी दिला?” राऊतांपाठोपाठ सुप्रिया सुळेंचा सवाल

पोलिसांकडे महत्त्वाचा पुरावा

पोलिसांनी हा दावाही केला आहे की सदर अल्पवयीन मुलाने मद्यपान केलं होतं याचा पुरावा आहे. कारण तो ज्या ठिकाणी गेला होता त्या बारचं सीसीटीव्ही फुटेज आणि रेस्तराँमधली बिलं ही देखील पोलिसांना मिळाली आहेत. हा अल्पवयीन मुलगा पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. अपघातापूर्वी तो मित्रांसह मद्यपान करत होता. त्याचं दीड तासाचं बिल ४८ हजार रुपये झाल्याचीही माहिती समोर आली आहे.