Pune Porsche Crash Case Maharashtra Govt Action Against Juvenile Justice Board : पुण्यातील पोर्श कार अपघातप्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यात मद्यधुंद अवस्थेत भरदाव वेगाने कार चालवत दुचाकीवरील दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला बाल न्याय मंडळाने ३०० शब्दांचा निबंध लिही आणि पोलिसांसह दोन आठवडे काम कर अशी अट घालत त्याचा जामीन मंजूर केला होता. या घटनेनंतर समाजमाध्यमांवर आणि महाराष्ट्रात चांगलाच संताप पाहायला मिळाला. त्यानंतर आरोपी मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. दरम्यान, आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. सत्तेचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून राज्य सरकारने पुण्यातील बाल न्याय मंडळाच्या दोन राज्य-नियुक्त सदस्यांची हकालपट्टी केली आहे.

पुण्यातील कल्याणी नगर भागात मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवून अल्पवयीन मुलाने अश्विनी कोस्टा व अनिश अवधिया या दोघांना (दुचाकीवरून प्रवास करणारे तरुण व तरुणी) चिरडलं. ही घटना घडल्यानंतर तातडीने या मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र, न्यायालयात हजर केल्यानंतर या मुलाला न्यायाधीशांनी ३०० शब्दांचा निबंध लिही, पोलिसांवर राहून वाहतुकीचे नियम समजून घेण्याची शिक्षा सुनावली होती. त्याचा जामीन मंजूर करताना ३०० शब्दांचा निबंध लिहून देण्याची अट घातली होती. या निंबधामध्ये अपघात घडल्यानंतर काय करायला हवे किंवा अपघात घडू नये म्हणून स्वत: काय काळजी घ्यायला हवी यावर निबंध लिहिणे आवश्यक होते. बालनिरीक्षणगृहातून बाहेर पडल्यानंतर अखेर अल्पवयीने मुलाने ३०० शब्दांचा निबंध बालहक्क मंडळकडे वकिलांमार्फत सादर केला.

court accepts report filed by eow against shiv sena leader ravindra waikar in Jogeshwari land scam mumbai
रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद; गुन्हे शाखेने दाखल केलेला अहवाल न्यायालयाने स्वीकारला
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Sunil Tingre notice, Supriya Sule, Sharad Pawar,
कल्याणीनगर अपघात प्रकरण : आमदार सुनील टिंगरे यांनी पाठविलेल्या नोटीशीत ‘यांची’ही नावे !
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Mumbai High Court Verdict On Marriage Cruelty.
सुनेला टीव्ही पाहू न देणे ही क्रूरता? मुंबई उच्च न्यायालयातील खटला २० वर्षांनी निकाली
thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

हे ही वाचा >> चाकण एमआयडीसीतील गुन्हेगारांवर आता जरब; पोलीस आयुक्तांचा इशारा, “कंपनी व्यवस्थापनाला त्रास दिल्यास…”

नेमकी काय घटना घडली होती?

पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन (साडेसतरा वर्षे) मुलगा दारूच्या नशेत मोटार चालवत होता. त्याने वाहतुकीचे नियम मोडत एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील तरुण अनिश अवधिया व त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा त्याच्या कारखाली चिरडले गेले. अश्विनी कोस्टा हिचा जागीच मृत्यू झाला; तर अनिश अवधिया याला स्थानिकांनी रुग्णालयात नेलं. मात्र, रुग्णालयात उपचारांदरम्यान अनिशचा मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेनंतर पुणे शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि सांगितले, “या प्रकरणातला आरोपी अल्पवयीन आहे. या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यातील कलमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील आणि ज्या बारचालकाने या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मद्य दिले, त्यांच्याविरोधातही कलम ७५ व ७७ अंतर्गत कारवाई करण्यात आली. अल्पवयीन मुलाच्या वडिलांना काही दिवसांनी अटक करण्यात आली. बारचालकाविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. या मुलाला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी व प्रशासनातील अनेकांनी प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.