कल्याणीनगर अपघात प्रकरणातील मुलाला वाचविण्यासाठी त्याची आई शिवानी अगरवालने रक्ताचा नमुना दिला होता. शिवानीने पुरावा नष्ट करण्यासाठी हे कृत्य केले. रक्ताचा नमुना आईचा असल्याचा अहवाल प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने दिला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी न्यायालयात दिली. याप्रकरणात अल्पवयीन मुलाची आई, बांधकाम व्यावसायिक वडील विशाल अगरवाल, ससूनमधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी बुधवारी दिले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात शिवानी अगरवाल, विशाल अगरवाल (दोघे रा. ब्रह्मा सनसिटी, वडगाव शेरी), ससूनमधील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे डॉ. अजय तावरे, आपत्कालीन वैद्यकीय विभागातील अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यानंतर त्यांना बुधवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अगरवाल दाम्पत्याच्या पोलीस कोठडीत १० जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले, तसेच डाॅ. तावरे, डॉ. हाळनोर, घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीत ७ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

हेही वाचा >>> ९० गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुंडाला घरात शिरून केलं अटक; निगडी पोलिसांची दबंग कामगिरी

शिवानी अगरवालने मुलाला वाचविण्यासाठी स्वत:च्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात दिले होते. पोलिसांनी रक्ताचे नमुने जप्त करून न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. याबाबत अहवाल पोलिसांना नुकताच मिळाला. रक्ताचे नमुने शिवानीचे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले, असे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले. अपघात प्रकरणातील तपासात प्रगती झाली आहे. अटक आरोपींची एकत्रित चौकशी करायची आहे. मोबाइल संच विश्लेषणातून माहिती मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

आरोपींच्या वतीने ॲड. सुधीर शहा, ॲड. ऋषिकेश गानू, ॲड. प्रशांत पाटील, ॲड. विपूल दुशिंग, ॲड. शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली.

आरोपी पोलीस कोठडीत आहे. पोलीस तपासातील प्रगती, तसेच नवीन कारणे देऊन कोठडी मागत आहेत. आरोपींची घरझडती पूर्ण झाली असून, त्यांचे मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी. आरोपींकडून तपासात सहकार्य करण्यात येईल, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

हेही वाचा >>> राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा, मोसमी पावसाची गोव्यात अल्पविश्रांती

न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वाचा

न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल तपासात महत्त्वाचा ठरणार असून, या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येत आहे. याप्रकरणात मंगळवारी अश्फाक इनामदार आणि अमर गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गायकवाडची प्रकृती व्यवस्थित नसल्याने मंगळवारी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला रुग्णालयातून बुधवारी सोडण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात दिली.

फरासखाना कोठडीत अस्वच्छता

शिवानी अगरवालला फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील कोठडीत (लॉकअप) ठेवण्यात आले आहे. कोठडीत अस्वच्छता आहे. अस्वच्छतेमुळे त्रास होत असल्याची तक्रार शिवानीने न्यायालयात केली. तिच्या तक्रारीची न्यायालयाने दखल घेतली. वकिलांमार्फत न्यायालयात तक्रार नोंदवावी, असे आदेश देण्यात आले.

पबमालकांच्या जामीन अर्जावर १० जून रोजी सुनावणी

अल्पवयीन मुलाला मोटार दिल्याप्रकरणी विशाल अगरवाल, तसेच मद्य विक्री प्रकरणी ब्लॅक आणि कोझी पबचे मालक आणि व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सोमवारी (१० जून) सुनावणी होणार आहे. जामीन अर्जावर पोलिसांनी त्यांचे म्हणणे न्यायालयात सादर केले आहे.

Story img Loader