पुणे : टपाल सेवेत विश्वासार्हता संपादन केलेल्या पुणे टपाल विभागाने आधार कार्डातील दुरुस्ती, नवीन आधार कार्ड देण्यातही राज्यभरात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. गेल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत) टपाल विभागाने ९२ हजार ३५८ मुलांना नवीन आधार कार्ड, तसेच इतरांच्या कार्डात सुधारणा करून दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यामध्ये आधार कार्ड नोंदणीसाठी २४६ केंद्रे कार्यरत आहेत. गेल्या सहा वर्षांत पोस्टाने १० लाख ७४ हजार ८६१ कार्ड अद्ययावत (अपडेट) करून दिली आहेत. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन आम्ही आता पुणे टपाल मुख्यालयासह आणि शहर टपाल कार्यालयातही दोन नवीन आधार कक्ष वाढवले आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी दिली.

हेही वाचा : पुण्यात तरुणाईला ’मेफेड्रोन’चा विळखा…अशी होते तस्करी

आधार कार्डावरील घराचा पत्ता, विवाहानंतर बदललेले नाव, मोबाइल नंबर बदलण्यासाठी, चुकलेल्या मजकुराची दुरुस्तीसाठी नागरिक येतात. मुलांची आधार कार्ड काढायची असतात. त्यामुळे वर्षभर या सेवेला नागरिकांची गर्दी असते. मध्यवर्ती पुण्यातील टपाल कार्यालयात आधार कार्ड सेवेसाठी गर्दी असते. ग्रामीण भागातही या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. पुणे रेल्वे स्थानकावर टपाल खिडकी आहे. तेथे स्पीड पोस्ट आणि अन्य सुविधाही उपलब्ध आहेत. या ठिकाणी सकाळी दहा ते सहा या वेळेत आधार कार्ड सेवा दिली जाते. शहरात सर्वाधिक प्रतिसाद असलेल्या केंद्रांमध्ये पुणे रेल्वे स्थानकावरील खिडकीचा समावेश झाला आहे, असे जायभाये यांनी सांगितले.

हेही वाचा : खासगी जागेत मोबाइल मनोरे उभारणाऱ्या कंपन्यांना नोटीस… ‘ही’ होणार कारवाई

महाराष्ट्र विभागात पुणे प्रथम

विभाग नवीन आधार कार्ड, बदल केलेली एकूण आधार कार्ड
पुणे ९२ हजार ३५८

गोवा-पणजी ९१ हजार १५५
नवी मुंबई ५७ हजार ६१४

औरंगाबाद ३६ हजार ९५९
नागपूर ३२ हजार ८५८

मुंबई १९ हजार १४६
(एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीतील आकडे)

हेही वाचा : सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून स्वतंत्र कक्ष

पुणे विभाग

वर्ष : नवीन, अद्ययावत केलेली कार्ड

२०१८-१९ : १ लाख ४९ हजार ४५८

२०१९-२० : २ लाख ९७ हजार ८६८

२०२०-२१ :१ लाख ९० हजार ९०४

२०२१-२२ : २ लाख ८६ हजार ५७६
२०२२-२३ : २ लाख २२ हजार ६३१

२०२३-२४ : १ लाख ४८ हजार ६४०

(ऑगस्टअखेरपर्यंत)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune post office department ranks first in the state in update and issue of new aadhaar cards pune print news vvk 10 css