पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील महावितरणच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. ६) सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणने दिली.

शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. या मार्गावरील महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागत असल्याने गणेशखिंड, मॉडेल कॉलनी, दीप बंगला परिसर, वडारवाडी, गोखलेनगर, जनता वसाहत, एमआयजी कॉलनी, वैदूवाडी, जनवाडी, वेताळबाबा चौक, मंगलवाडी, सेनापती बापट मार्ग, रमणबाग चौक, न्यू मराठी स्कूल, नारायणपेठ, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, रोकडोबा मंदिर परिसर, लक्ष्मी रोड, कुमठेकर चौक, पोलीस लाईन वसाहत, घोले रोड, मॉडर्न कॉलेज, विजय टॉकीज, रेवेन्यू कॉलनी, सिमला ऑफीस, आकाशवाणी, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, मेट्रो स्टेशन, संचेती हॉस्पिटल, ठुबे पार्क, औंध गाव, सिद्धार्थ नगर, परिहार चौक, ब्रेमेन चौक, संघवी रोड, ओम सुपर मार्केट, थोरात चौक, वाकडेवाडी, साखर संकुल रोड, चाफेकरनगर, आकाशवाणी कॉलनी, राहुल थिएटर, खैरेवाडी, दळवी हॉस्पिटल, अशोकनगर, रेंज हिल्स रोड, काकडे मॉल, एबीआयएल, मोदीबाग, चव्हाणनगर तसेच आपटे रोड, रुपाली गल्ली, शिरोळे रोड, घोले रोड, पुलाची वाडी, संभाजी गार्डन, एफसी रोड, वैशाली हॉटेल, सुतारदरा, शिवतिर्थनगर, साम्राज्यनगर, शिक्षकनगर, जयभवानीनगर, किष्किंधानगर या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वीज बंदबाबत संबंधित ग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर महावितरणकडून कळविण्यात आले असून या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मेट्रो, महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे.

Despite government announcement smart prepaid meters are being distributed secretly causing unemployment for contract meter readers
राज्यभरात यंदा वीज देयक वेळेवर नाही… संतप्त कंत्राटी मीटर वाचक…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
traffic diversion Pune city Shri Ganesh Jayanti Chhatrapati Shivaji Road
पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त मध्यभागातील वाहतूकीत उद्या बदल, छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद
mahavitaran latest news in marathi
पुणे : घरगुती ग्राहकांच्या वीजदरात कपात
solar projects ajit pawar
सौर ऊर्जा प्रकल्प आठवडाभरात कार्यान्वित करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश
State Electricity Regulatory Commission imposes fine of Rs 1 lakh on Mahavitaran for new electricity connection without providing meter Mumbai news
मीटर न देताच नवीन वीजजोडण्या दिल्याने नाराजी; राज्य वीज नियामक आयोगाकडून महावितरणला एक लाख रुपये दंड
Loksatta explained What are the consequences of the privatization of electricity substations in the state
विश्लेषण: राज्यातील विद्युत उपकेंद्रांच्या खासगीकरणाचे परिणाम काय?
Story img Loader