सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फिडरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. जवळपास बारा तास वीजपुरवठा खंडित होता. मात्र विद्यापीठातील परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह पाहुण्यांना वीजपुरवठा खंडित झाल्याचा त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा >>>पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपची शुक्रवारी जाहीर सभा
विद्यापीठातील फिडरमध्ये बिघाड झाल्याने रात्री अडीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर जवळपास बारा तासांनी बिघाड दूर करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र मुख्य निवडणूक अधिकारी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे आयोजित ‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रातही वीजपुरवठा खंडित झाल्याने त्रास झाल्याचे बोलून दाखवले गेले. तर, विद्यापीठ उच्चदाब ग्राहक असल्याने विद्यापीठाच्या आवारातील वीजपुरवठ्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यातील व्यत्यय आणि खंडित वीजपुरवठ्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. महावितरण त्यास जबाबदार नसल्याचे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले.
हेही वाचा >>>पुणे : बाणेर रस्त्यावरील बंगल्यात चोरी ; अडीच लाखांचा ऐवज लंपास
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार म्हणाले, की विद्यापीठाच्या आवारातील फिडरमध्ये बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र बुधवारी दुपारी तंत्रज्ञांकडून त्याची दुरुस्ती करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगासह आयोजित कार्यक्रमाला अडचण येऊ नये यासाठी विद्युत जनित्राद्वारे (जनरेटर) वीजपुरवठा सुरू करण्यात आला.