पुणे : पुण्यातून प्रयागराज येथे जाण्यासाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. पुणेकरांना कुंभमेळ्यासाठी जाणे त्यामुळे सोयीचे होणार आहे. मात्र, हे विमान पुण्यातून दिल्ली आणि नंतर प्रयागराजला जाणार असल्याने काही नागरिकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची आरक्षणे पूर्ण झाल्याने अनेक नागरिक विमानांचा पर्याय निवडत आहेत. पुण्यावरून प्रयागराज येथे जाण्यासाठी थेट विमानसेवा नव्हती. मात्र, आता ‘अकासा एअर’ कंपनीने मंगळवारपासून (२८ जानेवारी) एक महिना दररोज लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रयागराजसाठी विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, लोहगाव विमानतळावरून थेट प्रयागराजला न जाता पुणे ते दिल्ली आणि त्यानंतर प्रयागराज असा दोन टप्प्यांत प्रवास करावा लागणार आहे.

Stampede breaks out at Maha Kumbh on Mauni Amavasya
Stampede Breaks Out at Maha Kumbh : “महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झालीच नाही, फक्त भाविकांची…”, पोलिसांनी केलं स्पष्ट!
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
municipal corporation issued notices to 5000 establishments with unauthorized constructions in Chikhli Kudalwadi
पिंपरी : चिखली, कुदळवाडीतील पाच हजार लघुउद्योजकांना नोटीस; उद्योजकांचा एमआयडीसी बंद करण्याचा इशारा
pimprichnchwad municipal corporations taxation and collection department is hosting Me jababdar kardata rap contest to encourage property tax payments
रील-रॅप गाणे बनवा, बक्षिसे मिळवा!
causes of GBS, GBS, Central high level team ,
‘जीबीएस’च्या नेमक्या कारणांचा शोध! केंद्रीय उच्चस्तरीय पथकाकडून पुण्यात तपासणी सुरु
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Sandeep Kshirsagar FB
“धनंजय मुंडेंचा राजीनामा अशक्य”, अजित पवारांच्या त्या प्रतिक्रियेनंतर संदीप क्षीरसागर स्पष्टच बोलले
Wamik Karad Audio Clip
“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…

महाकुंभ हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव आहे. देशभरासह परदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराज येथे दाखल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या आणि भाविकांच्या मागणीनुसार पुणे ते प्रयागराज ही अतिरिक्त विमान उड्डाण सेवा सुरू करीत आहोत, असे अकासा एअरलाइन्सचे मुख्य वाणिज्य अधिकारी प्रवीण अय्यर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

कसे आहे वेळापत्रक?

पुणे ते प्रयागराज विमान सकाळी ७.३० वाजता पुण्यातून उड्डाण करेल आणि ९.४५ वाजता दिल्ली येथे पोहोचेल, तर दिल्लीवरून १०.५० वाजता प्रयागराजच्या दिशेने उड्डाण करत १२.१५ मिनिटांनी प्रयागराज विमानतळावर पोहोचेल. परतीसाठी विमान प्रयागराज येथून दुपारी १२:०५ वाजता उड्डाण करेल आणि दुपारी २.२० मिनिटांनी दिल्ली विमानतळावर पोहोचेल. दिल्ली विमानतळावरून दुपारी ३.०० वाजता पुण्याच्या दिशेने उड्डाण करून सायंकाळी ५.१५ वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल.

पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील भाविकांना प्रयागराज येथे जाण्यासाठी पुण्यातून प्रवास करणे सुलभ आहे. विशेषत: हवाई प्रवाशांना अत्यंत सोयीस्कर असल्याने मागणीदेखील मोठी आहे. कुंभमेळ्याला जाण्यासाठी सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांची उत्सुकता आहे. त्यामुळे एक किंवा दोन टप्प्यात आणि शुल्क आकारणी मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. ज्येष्ठांना विमानातून उतरणे, पुन्हा तपासणी आणि पुन्हा प्रवास यामुळे किचकट प्रवास वाटतो. त्यामुळे पुणे ते प्रयागराज ही थेट विमानसेवा सुरू होणे अपेक्षित आहे. – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

प्रयागराज येथे जाण्यासाठी १५ ते २० जणांचा ज्येष्ठ प्रवाशांचा समूह आहे. गेल्या महिनाभरापासून रेल्वेचे आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करत असून रेल्वेचे आरक्षण होत नाही. अकासा कंपनीची पुणे ते प्रयागराज ही विमानसेवा सुरू झाल्याचे समजले. परंतु, थेट प्रवास नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना सुकर प्रवास होणे कठीण आहे. पुणे ते प्रयागराज थेट विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे करण्यात आली आहे. – सुलक्षणा कापडणीस, नागरिक

Story img Loader