रेसिडेन्सी क्लबतर्फे ‘आरती’च्या प्रियदर्शिनी कर्वे (संशोधन), ज्येष्ठ टेनिसपटू नंदू नाटेकर (क्रीडा), प्रसिद्ध गायक संजीव अभ्यंकर (संगीत), ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले (शिक्षण), ज्येष्ठ सराफी व्यावसायिक दाजीकाका गाडगीळ, सामाजिक कार्यकर्ते अरमीन मोदी, ज्येष्ठ उद्योजक बी. आर. मल्होत्रा आणि ‘विठ्ठलनामा’ पुस्तकाचे लेखक विठ्ठल मणियार यांना यंदाचा पुणे प्राईड अॅवॉर्ड जाहीर झाला आहे. रविवारी (२४ मार्च) होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती विना गिरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.